कोणताही प्रतिकूल परिणाम नाही;कोरोना लस सुरक्षित... आमदार भीमराव केराम यांचे प्रतिपादन! गोकुंदा किनवट येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन.. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 25 January 2021

कोणताही प्रतिकूल परिणाम नाही;कोरोना लस सुरक्षित... आमदार भीमराव केराम यांचे प्रतिपादन! गोकुंदा किनवट येथे कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन..

किनवट प्रतिनिधी:

गोकुंदा किनवट येथे आज आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी ते बोलत होते.जिल्हा शल्य चिकीत्सक नांदेड सह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.


कोरोना लसीकरण मोहिम केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी आमदार भीमराव केराम म्हणाले की,कोरोना लसीचे कोणतेही परिणाम प्रतिकूल नसून कोरोना लस पूर्णतः सुरक्षित आहे.नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस टोचून घ्यावी.जेणे करून कोरोना महामारीला आटोक्यात आणता येईल.असे आवाहन त्यांनी किनवट माहूर तालुक्यातील जनतेला केले.माहूर,किनवट तालुक्यात पहिल्या टप्प्यात १४०० व्यक्तींना लस देण्यात येणार असून व्हॅक्सिनेशन चे एकूण दोन डोस देण्यात येणार आहे.त्या पैकी पहिला डोस आज दिनांक २५ रोजी पासून सुरू करण्यात आले आहे.प्रथम डोस घेतल्या नंतर दुसऱ्या डोस साठी एसएमएस द्वारे सूचना मिळेल इत्यादी लसीकरणा संबंधीची माहिती उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. कोरोना लसीकरण केंद्राचे उद्घाटन झाल्यानंतर सर्वप्रथम गोकुंदा रुग्णालयातील सात वैद्यकीय अधिकारी,कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घेतली.आमदार भीमराव केराम यांच्या उपस्थित डॉ.साबळे यांना लस देण्यात आले असून प्रामुख्याने डॉ.ओहोळ, डॉ.केंद्रे,डॉ.राठोड, डॉ.रेखा वडमारे,डॉ.अश्विन वाघमारे,बालाजी धर्मकाटे यांना लस देण्यात आली.उद्घाटन झालेल्या या लसीकरण केंद्राच्या कार्यक्रमा प्रसंगी नांदेड सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, भाजपचे अनिल तिरमणवार,वैद्यकीय अधीक्षक डॉ.धुमाळे डॉ.मुरमुरे,डॉ.तेलंग, फजल चव्हाण,जावेद खान,स्वीय सहाय्यक नीलकंठ कातले, प्रकाश कुडमते,उत्तम जाधव सह अधिकारी,कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages