विजेचे बिल माफ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चा हल्लाबोल मोर्चा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 10 January 2021

विजेचे बिल माफ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी चा हल्लाबोल मोर्चा


नागपूर - लाॅकडाऊन काळातील गरिब जनतेचे विजेचे बिल माफ करावे या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे शहरअध्यक्ष रवीभाऊ शेंडे यांच्या नेतृत्वात आज ०९ जानेवारी २०२१ रोजी इंदोरा मैदान ते नागपुर जिल्हा चे पालकमंत्री तथा राज्याचे उर्जामंत्री नितिन राऊत यांचे घरापर्यंत हल्लाबोल मोर्चा आयोजित करण्यात आला. इंदोरा मैदान येथून मोर्चा ला शुरूवात होऊन नितिन राऊत यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा जात असतांना इंदोरा चौक येथे पोलिसांनी बॅरिकेट्स लाऊन मोर्चा अडवला. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा बंदोबस्त साठी लावण्यात आला होता. पोलिसांनी समोर जाण्यास मज्जाव करत जवळपास १०० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व पोलिस बस मधे बसवून पोलिस मुख्यालय कडे रवाना केले. ३ ते ४ तास नंतर सर्व आंदोलकांना सोडन्यात आले. दरम्यान वंचित बहुजन आघाडी चे प्रतिनिधिंडल इंजि. राहुल वानखेडे, नागेश बुरबुरे, इंजि. राहूल दहिकर, प्रा. अजयकुमार बोरकर व मंगलमुर्ती सोनकुसरे यांनी मागण्यांचे निवेदन उर्जामंत्री नितिन राऊत यांच्या प्रतिनिधिंकडे सादर केले.

कोरोना च्या पार्श्वभुमीवर लाॅकडाऊन करण्याचा व जनतेला कामधंदा करन्यापासून अलिप्त ठेवण्याचा निर्णय हा शासनाचा होता. तेव्हा लाॅकडाऊन काळात लोकांना सर्वच आवश्यक सुविधा मोफत उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी सुध्दा शासनाचीच होती. विज ही दैनंदिन जिवनातली अत्यावश्यक वस्तू आहे. त्यामुळे मोफत विज पुरवठा हि शासनाची जबाबदारी आहे तसेच जनतेचा हक्क पण आहे. तेव्हा राज्यातील सर्वच गरीब, देहाडी मजदूर, बिपीएल, एपीएल व राशनकार्ड धारक, तसेच रिक्षाचालक, आॅटोचालक, हमाल, इं हातावर पोट असलेल्या जनतेचे विजेचे माफ करावे. हि मागणी वंचित बहुजन आघाडी तर्फे मांडण्यात आली. मागणी मान्य न झाल्यास संपूर्ण राज्यात तिव्र आंदोलन करन्यात येईल असा इशारा पक्षातर्फे देन्यात आला.

प्रसंगी राजू लोखंडे, विलास वाटकर, प्रफुल माणके, विवेक हाडके, सुनिल इंगळे, आनंद चौरे, मुरलीधर मेश्राम गुरुजी, डाॅ. धर्मेंद्र मंडलिक, नालंदा गणविर, माया शेंडे, सुजाता सुरडकर, कांचन देवगळे, निलिमा डंभारे, वर्षा धरगावे, समिता नंदेश्वर, संजय सूर्यवंशी, प्रविन पाटील, निर्भय बागडे, सोनु चहांदे, बालु हरकंडे, अमरदिप तिरपुडे, सुमधू गेडाम, अंकुश मोहिले, सिध्दांत पाटील, प्रशांत नारनवरे, दिनकर वाठोरे, विशाल वानखेडे, कमलेश शंभरकर, मिलन सहारे वानखेडे, रमेश कांबळे, शिशुपाल देशभ्रतार, धम्मदिप लोखंडे, अतुल गजभिये, अविराज थुल, अनिल धराडे, संजय वानखेडे, मनोज वाहाणे, राजेश पाटील, निशांत पाटील, अर्जुन हलमारे, संघपाल गाडेकर, भरत लांडगे, गोवर्धन भेले, पक्षाचे इतर पदाधिकारी, महिला आघाडी व युवा आघाडीचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages