राऊतखेडा ग्रामपंचायत साठी 07 जागा 20 उमेदवार रिंगणात .. वार्ड क्रमांक 2 मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 10 January 2021

राऊतखेडा ग्रामपंचायत साठी 07 जागा 20 उमेदवार रिंगणात .. वार्ड क्रमांक 2 मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता

नांदेड ( प्रशांत बारादे ):- कंधार तालुक्यातील  बारुळ पासून तीन किलोमीटर वर असणार्या राऊतखेडा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक  निवडणुकीसाठी अनुक्रमे दोन पॕनल तयार झाले आहेत .ग्राम विकास पॕनल व जनहित परीवर्तन पॕनल अशी मातब्बर गाव पुढाऱ्यांची पॕनल आहेत. विकासात्मक कामाचा मुद्दा घेऊन आप-आपल्या परीने दोन्ही पॕनल मधील उमेदवार व अपक्ष उमेदवार आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत .

            एकुण 7 सदस्य असलेल्या राऊतखेडा ग्रामपंचायत साठी 20 उमेदवार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी रिंगणात उतरले आहेत . ग्राम विकास पॕनल व जनहित परीवर्तन पॕनल अशी दुरंगी लढत होत असली तरी अपक्ष उमेदवार यांनी पण यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे व वार्ड क्रमांक 2 मध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे कारण या वार्डामध्ये सरपंच पदाचे संभाव्य दोन उमेदवार अनुक्रमे जनहित परीवर्तन पॕनल कडुन सुमित बारादे व ग्राम विकास पॕनल कडुन वैशाली बारादे व अपक्ष उमेदवारा मध्ये राजु तागमपुरे व अमर टोकलवाड ,बाबुराव शिंदगे व बालु मडके हे उमेदवार  निवडणूकीच्या रिंगणात प्रथमतः आपले नसिब आजमावत आहेत 

     गावातील पण स्थलातंरीत मतदाराना साद घालण्यासाठी उमेदवार तथा पॕनल प्रमुख दारोदारी घिरट्या घालताना दिसत आहेत 

         गावपातळीवर हायटेक प्रचार यंत्रणा यावेळी प्रथमच पहायला येत असल्यामुळे चर्चा मतदारातुन होत आहे .विशेष म्हणजे यावेळी प्रचार यंत्रणा नवयुवकांनी हाती घेतल्यामुळे व्हाॕट्स अॕप गृप मधुन आपल्या पॕनलचा रंगतदार प्रचार चालु केला आहे पण पॕनल प्रमुख आपल्या उमेदवाराचा विजय कशा पध्दतीने होईल यासाठी ओल्या पार्टीचे आयोजन दररोज केल्या जात आहे व या निवडणुकीत तळीरामाना सुगीचे दिवस आले आहेत .

                   ज्याचा खर्चा त्याचाच दिवसभर चर्चा अशे दिवसभर नशेत झिंगत गावातील मुख्य रस्तावरुन बेंधुंद पणे वावरताना दिसत आहेत पण शिक्षित मतदार ऐनवेळी कोणाला पसंती देतात हे निकाला नंतरच समजणार आहे .

No comments:

Post a Comment

Pages