"शिरदवाड च्या जनतेला नवा पर्याय; वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर लढत-'वंचित' च्या सोशल इंजिनिअरिंग ची पंचक्रोशीत चर्चा." - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 January 2021

"शिरदवाड च्या जनतेला नवा पर्याय; वंचित बहुजन आघाडीची स्वबळावर लढत-'वंचित' च्या सोशल इंजिनिअरिंग ची पंचक्रोशीत चर्चा."

प्रतिनिधी दि.9- शिरदवाड गावामध्ये बिनविरोध निवडीचे प्रयत्न अपयशी झाल्यांनंतर राजकीय रणधुमाळीस सुरवात झाली आहे.हातची समीकरणे राखून ठेऊन बिनविरोध निवडीच्या बैठकीस बसलेल्या पुढाऱ्यांनी बिनविरोधाची गाजराची पुंगी मोडून खात आपापली छावणी लढतीसाठी सज्ज केली आहे.या सर्वांमध्ये लक्षवेधी ठरत आहे ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी ची घोडदौड. आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवत वार्ड क्रमांक 04 व 05 मध्ये एकूण सहा उमेदवार उभे करून तगडे आव्हान निर्माण करून विरोधकांना एकत्र येण्यास भाग पाडले आहे.

        आगामी निवडणुकीस गतवर्षीच्या अविश्वासाच्या ठरावाची पार्श्वभूमी आहे.सोबतच विरोधाला विरोध करताना रखडलेली विकासकामे आणि परत गेलेला निधी यामुळे जनता त्रासून गेलेली असून नव्या पर्यायाच्या शोधत आहे."सत्ताधारी पक्षांनी शून्य विकासाचा अजेंडा राबविला आहे त्याला त्रासून जाऊन जनतेने आम्हाला स्वीकारले आहे कारण आम्ही सर्वसमावेशक भूमिका घेऊन मैदानात उतरलो आहोत" असे मत पॅनल प्रमुख संदीप कांबळे यांनी मांडले आहे.      त्याचसोबत आणखी एक गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे वं. ब.आघाडी ने केलेल्या सोशल इंजिनिअरिंग च्या प्रयोगाची. वॉर्ड नंबर 05 मध्ये कायम दुर्लक्षित असलेल्या व हक्काचे प्रतिनिधित्व नसलेल्या लिंगायत समाजातील स्थानिक उमेदवारी महादेव कुंभार या युवकास दिली आहे.सोबतच चर्मकार समाजातील प्रकाश उर्फ पिंटू टोणपे याना उमेदवारी देऊन सोशल इंजिनिअरिंग चा लक्षवेधी प्रयत्न केला आहे एकंदरीत सर्व वंचितांना घेऊन सत्तेत जाण्याचे धोरण वं.ब.आघाडी ने अवलंबले आहे.

वंचित बहुजन आघाडीने प्रचारास गती घेत रॅली, प्रचारसभा, घेत जनसंपर्क वाढवल्याने जनशक्ती विरुद्ध अर्थशक्ती अशी लढत होणार असल्याची चर्चा दबक्या आवाजात गावामध्ये सुरू आहे. दिनांक 10 रोजी सभा आयोजित करण्यात आली असून सभेमध्ये  आघाडी आपला वचननामा प्रसिद्ध कारभार असल्याचे सांगण्यात आले आहे.वंचित बहुजन आघाडी चे पॅनल प्रमुख म्हणून संतोष कांबळे,आर.डी.कांबळे(सर) प्रकाश कांबळे,वैभव कांबळे(तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी),महेंद्र कांबळे,बुद्धभूषण कांबळे व कार्यकर्ते काम पाहत आहेत.

No comments:

Post a Comment

Pages