नसोसवायएफ च्या आंदोलनाचे यश-डाँ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने साठी 40 कोटी मंजूर. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 8 January 2021

नसोसवायएफ च्या आंदोलनाचे यश-डाँ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजने साठी 40 कोटी मंजूर.

नांदेड - नॅशनल एससी, एसटी, ओबीसी,स्टुडन्ट अँड युथ फ्रंटने भारत सरकार शिष्यवृत्ती व डॉ.बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेतील रक्कम त्वरित जमा करण्यासाठी समाजकल्याण कार्यालय, नादेड समोर तीव्र आंदोलन केले. २५ डिसेंबर रोजी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे हे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्याची शिष्यवृत्ती वेळेवर वितरित करण्यास असक्षम असल्याचे म्हणत विद्यार्थ्यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते. या प्रकरणात विमानतळ पोलिस ठाण्यात जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी विद्यार्थ्यांवर गुन्हा नोंद झाला आहे. 

       या आंदोलनाचा धसका घेऊन सामाजिक न्याय मंत्रालयाने भारत सरकार कडे पाठपुरावा करत भारत सरकार शिष्यवृत्ती ५७१ कोटीचा निधी मंजूर करून घेतला आहे व काही दिवसात हे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत, तसेच डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे ४० कोटी रुपये सुध्दा विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत असे राज्याच्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सांगितले आहे.

 मागील दोन दर्षापासून भारत सरकार शिष्यवृत्ती व डाँ.बाबासाहेब आबेडकर स्वाधार योजनेची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर शैक्षणिक वर्ष संपल्यानंतरही मिळत नाही. भारत सरकार शिष्यवृत्तीचा उद्देश विमुक्त जातीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित संवर्धन करण्यासाठीच आहे. पण आज हा हेतु पूर्ण होताना दिसून येत नाही. शिष्यवृत्तीची रक्कम शैक्षणिक वर्ष

संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होते.पण शैक्षणिक वर्षात पैसे नसल्यामुळे विद्यार्थ्यांची आर्थिक पिळवणूक होत होती. तसेच अनेक विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण सोडावे लागत आहे. उच्च शिक्षणामध्ये मागासवर्गीय अनुसूचित जाती-जमाती व इतर भटक्या विद्यार्थ्यांची होणारी गळती ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात होत आहे. या संदर्भात शासनाला नसोसवायएफ ने निवेदन देऊन सुद्धा सामाजिक न्याय मंत्रालयाने मागणीकडे संबंधीत विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आज रोजी नसोसवायएफ या संघटनेने २५ डिसेंबर रोजी तीव्र आंदोलन केले, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केला.

 या आंदोलनात राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.हर्षवर्धन दवणे, राज्य प्रवक्ता प्रा.सतिश वागरे, मराठवाडा संघटक प्रकाश दिपके उपस्थित होते. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा प्रभारी संदीप जोंधळे, जिल्हा सचिव अक्षय कांबळे,जिल्हा प्रवक्ता मनोहर सोनकांबळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शुभम दिग्रसकर,बाळू भाग्यवंत, डॉ.प्रविण सावंत,यांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

या चालू शैक्षणिक वर्षात राज्यातील महाराष्ट्रातील विविध सर्व महाविद्यालयांनी आणि अनुसूचित जातीच्या विद्याथ्यांनी सरकारच्या महाडीबीटी या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज तत्काळ सादर करावेत. तसेच विहित वेळेत लाभार्थ्याने आपले बँक खाते आधार संलग्नीकृत करून घ्यावे, जेणे करून शिष्यवृत्ती व डाँ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना आपल्या बँक खात्यात जमा होण्यास कुठलीही अडचण येणार नाही. असे आवाहन नसोसवायएफ चे राज्य प्रवक्ता प्रा. सतिश वागरे यांनी केले आहे.



No comments:

Post a Comment

Pages