रतनकुमार साळवे सरपंच सेवा संघाच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित... - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 23 January 2021

रतनकुमार साळवे सरपंच सेवा संघाच्या राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित...

 

औरंगाबाद (प्रतिनिधी) शुक्रवार रोजी शिर्डी येथे रतनकुमार साळवे यांना सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख,शिर्डी लोकसभेचे   खासदार भाऊसाहेब लोखंडे, कार्यक्रमाचे संयोजक, सरपंच सेवा संघांचे अध्यक्ष यादवराव पावशे पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.संपूर्ण राज्यातुन पत्रकार आणि सरपंच मोठ्या संख्येने यावेळी कार्यक्रमाला उपस्थितीत होते. मोठ्या दिमाखात हा सोहळा संपन्न झाला.औरंगाबाद जिल्ह्यतुन रतनकुमार साळवे यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती.साळवे यांना उत्कृष्ठ पत्रकारिता केल्याबद्दल विविध पक्षसंघटना,संस्थेच्या वतीने आजपर्यंत ३० पुरस्कार मिळालेले आहेत.यामध्ये ३ राज्यस्तरीय पुरस्कार आहेत. रतनकुमार साळवे उत्तमरित्या पत्रकारिता करत असतानाच,निळे प्रतीक बहूउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक जणहितवादी उपक्रम राबवलेले आहेत.कोरोना संकट काळी लॉकडावून दरम्यान त्यांच्या संस्थेचे  कार्य प्रभावी असेच राहिलेले आहे. त्यांच्या या पुरस्कारामुळे त्यांच्यावर  राज्यभरातून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Pages