विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सचिन निकम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 17 January 2021

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा सचिन निकम


                              सचिन निकम यांच्या वाढदिवसा निमित्य त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख 

सच्चाई और संघर्ष के अलावा, 

मेरे पास कोई और विरासत नहीं हैं.....

भाऊला साजेशा ह्या दोन ओळी....


काही माणसं मनानं, कार्याने खूप मोठी असतात याच जित्त जागत उदाहरण म्हणजे सचिन भाऊ निकम खरं तर भाऊची मैत्री ही वेगळीच आहे. ते दिशाहीन मित्रांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी दिशादर्शक म्हणून काम करतात. 

ते स्वतःसाठी काही करो अथवा ना करो पण ते कधीही कोणासाठीही काहीही करू शकतात आणि करतात ही ! याचा खूप मोठा अनुभव मला आलेला आहे, मी ही त्यातलाच एक आहे. एक आजातशत्रू जे नेहमी मंगल मैत्री व्यक्त करतात. माणसे जोडण्याचे काम करतात. 

अनोख्या कार्यपद्धतीमुळे ते नेहमीच उमटून पडतात.प्रामाणिक, स्वाभिमान, निस्वार्थीपना तर त्यांच्या आंगीच आहे, त्याबरोबरच सामजिक जाणीव आणि समाजाविषयी आणि डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीविषयी केवळ आपुलकी नाही तर ती बळकट झाली पाहिजे यासाठी सर्वच पातळीवर ते नेहमी एक पाऊल पुढं टाकत असतात.

मी काहीतरी केलं आहे किंवा करतो आहे या अविर्भावात ते कधीच दिसले नाहीत आणि जगत ही नाहीत. मी करतो ते माझे कर्तव्य आहे ही त्याची प्रामाणिक भूमिका. अतिशय नियोजनबद्ध काम करण्याची त्याची कार्य पद्धत माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.

मागील बारा वर्षांपासून ते आंबेडकरी विद्यार्थी चळवळीत सक्रिय कार्य करत आहेत.रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, कामगार सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी, अन्याय अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवला. त्यांना न्याय मिळून देण्याचं काम त्यांनी केलं आहे करत आहेत.

औरंगाबाद शहरामध्ये शेकडो आंदोलने, मोचे, निदर्शने त्यांच्या नेतृत्वखाली करण्यात आले आहेत. आंबेडकरी समुदायाच्या आंदोलनात त्यांचा प्रामुख्याने पुढाकार असतो.

वेळ वेळप्रसंगी पक्ष संघटना बाजूला ठेवून आंबेडकरी एकजुटीची मोट बांधण्याचे काम तेच करतात.

आंबेडकरवादी अत्याचारविरोधी कृती समिती, औरंगाबाद च्या सर्व आंदोलनात नियोजनात त्यांचा सक्रीय सहभाग असतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नामांतर शहीदांच स्मारक व्हाव म्हणून स्मारकासाठी सतत पाठपुरावा करून त्यांच्या नेतृत्वखाली तीव्र आंदोलन करण्यात आले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विभाजनाचा डाव हाणून पाडण्यासाठी त्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. तेव्हा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या गाड्यांचा ताफा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर अडवला म्हणून पोलिसांनी त्यांना आणि आम्हाला अटक करून गुन्हा दाखल केला.

मागील पाच वर्षापासून मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेल्फेअर असोसिएशन व नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने आयोजित नागसेन फेस्टिव्हलच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवस सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात येते, याप्रमाणेच मागील पाच वर्षापासून डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ही तेच करतात.

किती ही अडचणी आल्या तरी नडगमगता निष्ठेने इमाने इतबारे काम चालूच ठेवणे हा त्यांचा गुणधर्म आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामधे मनुवादी मानसिकतेच्या गुंडांना पँथर्स स्टाईलने ठोकून काढण्याचं काम त्यांनी अनेक वेळा केलं आहे, तेव्हा याची दखल वर्तमापत्राने, इलेक्ट्रॉनिक मीडियाने ही घेतली होती. त्यांचावर औरंगाबाद शहरातल्या विविध पोलिस ठाण्यामध्ये आठ गुन्हे दाखल आहेत. सर्व गुन्हे सामाजिक आंदोलनातील आहेत, एकही गुन्हा वयक्तिक नाही. म्हणतात ना अन्याय अत्याचाराविरोधात थंड राहून षंढ होण्यापेक्षा, बंड पुकारून गुंड झालेले मला मान्य आहे. या म्हणीप्रमाणे मला अस वाटत हा तोच गुंड आहे की काय.....

खूप काही आहे लिहिण्यासारखं तूर्तास एवढेच...

भाऊ तुमच्या मेहनतीचे, जिद्दीचे, चिकाटीचे, तुमच्यातल्या प्रतिभेचे आणि प्रमाणिकपणाचे, तुमच्यात असलेल्या सामाजिक जाणिवांचे, तुमच्यातल्या बेडर आणि बेधडकपणाचे, तुम्ही जोपासत असलेल्या मानवी मूल्यांचे, मित्रत्वाच्या नात्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे

नव्हे त्या सर्व गुणांसाहित तुम्ही माझ्या पाठीशी असण्याचा अभिमान आहे, गर्व आहे...

माझ्यासारख्या कैकांचे तुम्ही हिरो.... 

दोस्तीतल्या दुनियेतला दिलदार माणूस...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेनवनातील विद्यार्थ्यांचा वाली. नागसेनवनातील देश विदेशातील आजी माजी विद्यार्थ्यांना जोडून ठेवणारा दुवा, आमचे मार्गदर्शक नेते, मोठे बंधू, अस्सल आंबेडकरी लीडर, आंबेडकरी चळवळीच युवा नेतृत्व, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष, रिपब्लिकन कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष, शहर पथ विक्रेता समिती, औरंगाबाद महानगरपालिका सदस्य, मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेयर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रहितासाठी उपयुक्त असलेल्या आंबेडकरी विचाराच्या ध्येयवेड्या या जिंदादिल मोठ्या भावाला वाढदिवसाच्या मनःपूर्वक काळीजभर शुभेच्छा....


- अॅड. अतुल राजेंद्र कांबळे

- जिल्हाध्यक्ष - रिपब्लिकन विद्यार्थी सेना, औरंगाबाद.

- मिलिंद नागसेनवन स्टुडंट्स वेलफेयर असोसिएशन.

No comments:

Post a Comment

Pages