विद्यार्थ्यांच्या मागण्याला अखेर यश विद्यापीठाने दिले लेखी पत्र - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 9 January 2021

विद्यार्थ्यांच्या मागण्याला अखेर यश विद्यापीठाने दिले लेखी पत्र

 औरंगाबाद:

विविध संघटनेच्या मार्फत दिनांक 6 जानेवारीपासून विद्यार्थी संघटनेने ठिय्या मांडला होता. विद्यार्थी संघटनेकडून विद्यापीठातील वस्तीगृह चालू करण्यासाठी आणि त्याच बरोबर ऑनलाइन शिक्षण बंद करून ऑफलाइन शिक्षण देण्यात यावे या बाबतीत ठिय्या मांडला होता. त्याचबरोबर विद्यापीठ पूर्णपणे सुरु करण्याचे निवेदन प्र-कुलगुरू व विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आले होते, यावेळी विद्यापीठ प्रशासन ही जबाबदारी जिल्हाधिकारी यांची आहे कोरोना च्या प्रादुर्भावामुळे ही जबाबदारी जिल्हाधिकारी तसेच मनपाकडे देण्यात आली होती असे यावेळी विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले, परंतु विद्यार्थी संघटनेकडून तात्काळ वस्तीगृह चालू करण्यात यावे व त्याचबरोबर लवकरात लवकर वर्ग चालू करण्यात यावे यासाठी विद्यार्थी संघटनेकडून 6 तारखेपासून उपोषणास सुरुवात करण्यात आले होते यामध्ये सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अमोल खरात, एस.एफ.आय चे जिल्हाध्यक्ष लोकेश कांबळे ,विद्यार्थी नेत्या दीक्षा पवार ,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे विद्यापीठ अध्यक्ष रामेश्वर कबाडे पाटील, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे विद्यापीठ अध्यक्ष श्रद्धा खरात, व पांडुरंग भुतेकर हे संशोधक विद्यार्थी सर्व संघटना विद्यार्थी कृती समितीच्या बॅनर खाली हे सर्व कार्यकर्ते 6 तारखेपासून उपोषणास सुरुवात केली, या उपोषणाची दखल घेताना विद्यापीठ प्रशासनाकडून विद्यार्थी कल्याण समन्वयक मुस्तजीत खान सर यांनी विद्यार्थ्यांना लेखी स्वरूपाचे पत्र देऊन दिनांक 18 जानेवारी पासून संशोधक विद्यार्थी वस्तीगृह चालू करणे त्याचबरोबर इतर वस्तीगृह माननीय जिल्हाधिकारी औरंगाबाद आयुक्त महानगरपालिका आणि शासनाच्या इतर सर्व संबंधित कार्यालयांना पत्रव्यवहार करून परवानगी मागितलेली आहे,

प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत मा. सचिव, उच्च व तंत्रशिक्षण यांच्याशी पत्रव्यवहार करून मार्गदर्शन मागविण्यात आलेले आहे.

विद्यापीठातील ग्रंथालयाचा संदर्भग्रंथ कक्ष सध्या सुरू आहे त्यामुळे आपण विद्यापीठ वस्तीगृह आणि प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्यासंबंधी अवलंबलेले आंदोलन मागे घेऊन विद्यापीठ प्रशासनास सहकार्य करावे. असे पत्र उपोषणकर्त्यांना डी.एस.डब्ल्यू माननीय मुस्तजीत खान यांच्याकडून देण्यात आले. यावेळी इतर संघटनेकडून सुद्धा पाठिंबा देण्यात आला. रिपब्लिकन विद्यार्थी संघटनेचे सचिन निकम, पँथर रिपब्लिकन चे गुणरत्न सोनवणे, sfi चे राज्य प्रमुख  नितीन वावले,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश महासचिव प्रकाश जी इंगळे ,अण्णा सोनोने ,त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे, प्रदेश सरचिटणीस सादिक शेख मा.स.चे सचिन बोराडे एनएसयूआय चे योगेश बहादुरे ,राष्ट्रवादीचे दिपक बहिर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निशिकांत कांबळे, सुरेश सानप,सत्यशोधक महिला आगडीच्या स्वाती अदोडे , svs च्या स्वाती चाके, मनिषा थोरवे, रमा बोर्डे,युराज सुतार ,कवि रामप्रसाद ,प्रविण चिंतोरे, तसेच विद्यापीठातील सर्व विद्यार्थी व शहरातील राजकीय संघटना सुद्धा यावेळी पाठिंबा दिला आरपीआयचे नागराज भाऊ गायकवाड, अरुण भाऊ बोर्डे यांनी यावेळी पाठिंबा दर्शविला.

No comments:

Post a Comment

Pages