माहूर - माहूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी वाढीव जागा द्या व पुतळा निर्मितीसाठी जोते (फाउंडेशन) उभारून देण्याच्या मागणी साठी डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती, बौद्ध महासभा, व डॉ बाबसाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने दि.०८ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक नियोजित जागेवर आमरण उपोषण सुरु केले होते. उपोषणकर्त्यांची तातडीने भेट घेऊन नगराध्यक्ष कु.शीतल जाधव, मुख्याधिकारी विद्या कदम यांनी न.प.च्या वतीने येत्या पंधरा दिवसाच्या आत सर्वसाधारण सभेत याबाबत तोडगा काढून मागणी पूर्ण करण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने उपोषणार्थीना शरबत देऊन उपोषण स्थगित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी पूर्वी देण्यात आलेली न.प. मालमत्ता क्र.२२/१ मधील १०x१५ फुट ही जागा अत्यंत तोकडी पडत असल्याने गेल्या दोन वर्षापासून डॉ.बाबसाहेब आंबेडकर स्मारक समिती, बौद्ध महासभा, व डॉ बाबसाहेब आंबेडकर प्रेमी जनतेच्या वतीने किमान १००x४० फुट जागा देण्यात यावी अशी मागणी विविध निवेदनाव्दारे केली होती. परंतु कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दि.२६ जानेवारी २०२१ प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन मुख्याधिकारी न.प. माहूर यांना देण्यात आले होते. त्या अनुशंगाने उपरोक्त मागणी सह पुतळा बसविण्यासाठी न.प. मार्फत जोते फाउंडेशन बांधून देण्याच्या मागणी साठी दि.०८ रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. यावेळी स्मारक समिती अध्यक्ष प्रकाश गायकवाड, मनोज कीर्तने, नगरसेवक दिपक कांबळे,डॉ.सत्यम गायकवाड, रेणुकादास वानखेडे, महेंद्र वाघमारे, रेणुकादास पंडीत, सिद्धार्थ तामगाडगे,आकाश कांबळे,विनोद शेंडे,सुभाष भवरे,कुमार कांबळे,सरपंच आनंदा किनाके, सुभाष लकडे, सुधीर साबळे,शंतनु कांबळे,निलेश उमरे,हर्ष भवरे,अदिसह १०० डॉ.बाबसाहेब आंबेडकर प्रेमी महिला व पुरुष नागरिक सहभागी झाले होते. यावेळी तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने, वंचित बहुजन आघाडी, लहूजी सेना, व विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा, दिला होता. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुमित राठोड शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव,प्राचार्य भगवानराव जोगदंड, राजकिरण देशमुख,विनोद कदम, व अन्य नागरिक उपस्थित होते. तर ऊपोषनाच्या तयारीसाठी नियोजन व प्रास्ताविक सिध्दार्थ तामगाडगे यानी केले.
 

 
 
 
 
 
 
 
 
 
No comments:
Post a Comment