माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 9 February 2021

माता रमाई आंबेडकरांचे मुंबईत स्मारक उभारणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 8 -  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी ; त्यागमूर्ती महामाता रमाई आंबेडकर यांचे मुंबईत वरळी विभागात भव्य स्मारक उभारणार ; त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी केले.सांताक्रूझ पूर्वेतील भीमछाया सांस्कृतिक केंद्र येथे कोकण रिपब्लिकन सामाजिक संस्थे तर्फे माता रमाई आंबेडकर यांच्या 123 व्या  जयंती सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ना रामदास आठवले बोलत होते.  यावेळी महामाता रमाई ची लेक या पुरस्काराचे वितरण ना रामदास आठवले आणि संपादक व्याख्याते बबन कांबळे यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील महिलांना  करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे आयोजक प्रकाश मोरे;  रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे; संघराज तांबे; नारायण जाधव; चंद्रकिरण सकपाळ; जयप्रकाश पवार; लक्ष्मण भगत; सोना कांबळे; चंद्रशेखर कांबळे; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी दीपिका चिपळूणकर; मधुबाला इंदवे; 

वनिता जाधव; सुप्रिया मोहिते; ऍड. अभया सोनवणे या महिलांचा  महामाता रमाईची लेक या पुरस्काराने    सन्मानित करण्यात आले. 


माता रमाई आंबेडकर यांनी दारिद्र्य दुःख सहन करीत प्रचंड त्याग केला आहे. त्यांच्या स्मृती या आंबेडकरी चळवळीला सदैव प्रेरणादायी आहे.त्यामुळे मुंबईत त्यांचे भव्य स्मारक उभारणे आवश्यक आहे. त्यांचे मुळगाव वनंद येथे ही स्मारक उभारले पाहिजे. वरळी स्मशानभूमी येथे माता रमाई चा पुतळा उभारण्यात आला आहे. त्या भागात माता रमाई चे स्मारक उभारण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन ना रामदास आठवले यांनी यावेळी दिले. आंबेडकरी चळवळीचे व्यख्याते; ज्येष्ठ संपादक बबन कांबळे यांनी माता रमाई यांनी महिलांना स्वावलंबी होण्याचा संदेश दिला आहे.त्यांची जयंती गावागावात साजरी केली पाहिजे त्या साठी नव्या पिढीने पुढाकार घेण्याचे आवाहन संपादक बबन कांबळे यांनी यावेळी केले. 


               

No comments:

Post a Comment

Pages