केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते वोकहार्ड फाऊंडेशन तर्फे इंडिया कोरोना वॉरियर्स पुरस्काराचे वितरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 February 2021

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते वोकहार्ड फाऊंडेशन तर्फे इंडिया कोरोना वॉरियर्स पुरस्काराचे वितरण

 मुंबई दि. 7 - कोरोनाच्या संकटकाळात ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून जनतेची रुग्णांची गरजूंची सेवा केली त्यांना  वोकहार्ड  फाउंडेशन तर्फे इंडिया कोरोना वॉरीयर्स या पुरस्काराचे वितरण रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते आज मुंबईत बिर्ला मातोश्री सभागृहात करण्यात आले. यावेळी  वोक हार्ड फाउंडेशन चे विश्वस्त आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हुझैफा खोराकिवाला उपस्थित होते.


 यावेळी नर्स ऍश्ले ईपेन;  बायरेन लिंबाचिया; सिमरन आहुजा; आदींना इंडिया कोरोना वॉरॉयर्स पुरस्काराने गौरव करण्यात आला. यावेळी गो कोरोना चा नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांचा वोकहार्ड फाउंडेशन तर्फे डॉ हुजैफा खोरकिवाला यांच्या हस्ते  गौरव करण्यात आला. यावेळी ना रामदास आठवले म्हणले की मागचे वर्षे कोरोना चे वर्ष होते हे वर्ष नो कोरोना चे असावे असे सांगत  आप हो डॉक्टर खोराकिवाला और मैं हु जयभीमवाला अशी कविता सादर करताच तुफान टाळ्यांचा कडकडाट झाला.


                

No comments:

Post a Comment

Pages