किनवट शहरवासीयांच्या हितासाठी पत्रकार प्रशांत वाठोरे यांच्याकडून जनसामान्य हित याचिका दाखल. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 February 2021

किनवट शहरवासीयांच्या हितासाठी पत्रकार प्रशांत वाठोरे यांच्याकडून जनसामान्य हित याचिका दाखल.किनवट (तालुका प्रतिनिधी)

शहरात उद्भवणारा "सार्वजनिक उपद्रव"  आज किनवट शहरात व परिसरात गंभीर असे स्वरूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेच  परंतु नागरिकाचे जगणे असह्य  झाले आहे. त्यामध्ये गाढवांच्या सार्वजनिक रस्त्यावरच्या मस्ती मुळे सर्वसामान्याचे अपघात होत आहेत. तसेच किनवट शहरवासी व व परिसरातील नागरिक त्यांच्या दुचाकी सार्वजनिक रस्त्यावर  बेशिस्तपणे लावत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. तसेच किनवट शहरातील सार्वजनिक रस्त्यावर गल्लोगल्ली सदृढ शरीर धारण करणारे भिकारी हे तर फार सर्वसामान्याला भावनिक  साद देऊन ते जनसामान्यांना एक प्रकारचा त्यांच्या मनाच्या विरुद्ध कृती करण्यास भाग पाडून सार्वजनिक उपद्रव देत आहेत. यासंबंधातील अनेक बातम्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून सुद्धा आलेल्या आहेत किनवट वासी व परिसरातील जनसामान्यांच्या त्रासाचे कारण हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जाते म्हणून की काय परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत रतन वाठोरे यांनी 2 फेब्रुवारी 2021 रोजी उपविभागीय दंडाधिकारी साहेब किनवट  यांच्या न्यायालयात फौजदारी कलम 133 व भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे त्यांच्या विधिज्ञ मार्फत जनसामान्यांच्या हितासाठी सार्वजनिक उपद्रव  थांबवण्याबाबत याचिका दाखल केली आहे सदर याचिकेवर काय निर्णय होईल याची किनवट शहरातील व परिसरातील जनसामान्य हे कुतूहलाने वाट बघत आहेत. सार्वजनिक उपद्रव काढून टाकणे  हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्तव्य आहे या कर्तव्य मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कसूर करत आहे का ? की  नागरिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच किनवट नगरपालिकेच्या आदेशाचे पालन करत नाहीत याचाही खुलासा हे याचिकेद्वारे जनसामान्यांना कळणार आहे.

सदर याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी त्याच्या याचिकेमध्ये 'गेल्या अनेक दिवसापासून किनवट शहरात व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोकाट गाढवे फिरत असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत" म्हणजे सर्वसामान्य माणसाला जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे सदर सार्वजनिक   उपद्रव  काढून टाकण्याचे अधिकार हे नगरपालिकेला आहेत.तसेच किनवट मध्ये व परिसरात मोकाट गुरे, डुकरे, यामुळे अपघाताचे प्रमाण तर वाढलं आहे परंतु ते करत असलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहरात सार्वजनिक उपद्रव देणार  कुत्रे, डुकरे, गायी-म्हशी मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिकांना उप्द्व्याप  देत आहेत. तसेच तसेच गाढवाच्या मस्ती मुळे अनेक अपघात झाले आहेत शहरात सार्वजनिक रस्त्यावर वाहने दुचाकी कोठेही पार्क केल्या जाते त्यामुळे ट्रॅफिक जामचा प्रभाव दिसून येत आहे. बेशिस्तपणे वाहन पार्क करणार्‍यावर नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन कारवाई करू शकते सदर सार्वजनिक उपद्रव   त्वरित थांबविण्यात यावा यासाठी परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत वाठोरे यांनी दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे सदर याचिकेची दखल न्यायदंडाधिकारी साहेबांनी घेतलेली आहे किनवट वासियांचा सार्वजनिक उपद्रव लवकरच कमी होणार आहे असे आज तरी आपल्याला म्हणावे लागेल कृती आणि अपेक्षा यामध्ये फरक आहे सदर सार्वजनिक उपद्रव कमी होण्यासाठी प्रशासन काय खंबीरपणे पावले उचलते याकडे किनवट वाशी व परिसरातील जनसामान्यांचे लक्ष लागून आहे.

No comments:

Post a Comment

Pages