एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून बदनामी करणे व शासनाची फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई करणे बाबत आज भीम आर्मी भारत एकता मिशन, रिपब्लिकन सेना व पँथर्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 February 2021

एन एच ए आय च्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून बदनामी करणे व शासनाची फसवणूक करणाऱ्यावर कडक कारवाई करणे बाबत आज भीम आर्मी भारत एकता मिशन, रिपब्लिकन सेना व पँथर्स रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले

  औरंगाबाद :           एखाद्या प्रकल्पाची अधिसूचना निघाल्यानंतर नियमानुसार त्या गटात  खरिदी विक्री करता येत नाही, सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गा वरील सदरील गट क्रमांक 132 हा 2015 मध्येच अधिसूचित केलेला असताना काही राजकीय लोकांनी शेतकऱ्याची फसवणूक करुन 2018 साली त्या गटात जमीन खरेदी केली ती जमीन टोल प्लाझासाठी अतिरिक्त भूसंपादन होत असुन ती जमीन हायवे लगत नसल्यामुळे नागपूर येथील विभागीय कार्यालयाकडून मार्गदर्शन मागवले होते. त्यावर प्रादेशिक अधिकाऱ्यांनी या निवाड्याविरुद्ध लावादात दावा दाखल करण्यास परवानगी दिली. त्यामुळे  राजकिय दबाव तंत्र वापरून हे लोक एनएचएआय चे प्रकल्प संचालक अजय गाडेकर यांची बदनामी करत आहेत

अजय गाडेकर हे एक अनुसूचित जातीचे कर्तव्य दक्ष अधिकारी असुन शासनाची होणारी फसवणूक ते थांबवत आहेत तसेच शासकिय नियमानुसार काम करत आहेत त्यामूळे त्यांना त्रास देण्याचे काम काही राजकिय लोक करत आहेत.

         तीन वर्षांपूर्वी याच हायवे साठी भूसंपादन करताना तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शशिकांत हतगल यांनी करोडी गावातील 19 मालकांची जमीन हायवेलगत दाखवून तब्बल 41 करोड रुपयांची शासनाची फसवणूक झाल्याचे आरोप झाले होते.

 विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार एक उच्चस्तरीय समितीने केलेल्या चौकशीत ते सिद्ध झालेले असुन आपल्या वर्तमान पत्रात या बद्दल बातम्या छापून आलेल्या आहेत.

 या जमिनींना हायवे लगतचा दर देता येणार नसल्याने सक्षम प्राधिकाऱ्याच्या निवाड्याविरुद्ध लावदात दावा दाखल असताना देखील

राजकीय लोकांच्या मालकीची जमीन हि सक्षम प्राधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांनी हायवे लगत दाखवलीच कशी व ती मंजुरीसाठी एन एच ए आय कडे पाठवली असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामूळे यात काही पैशाची देवाण घेवाण झाल्याचा संशय बळावतो,

 या प्रकरणी राजकीय व्यक्ती व अधिकारी यांची आठ दिवसात चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी अन्यथा औरंगाबाद मधील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना यांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. या वेळी भीम आर्मी चे महाराष्ट्र उपाध्यक्ष बलराज दाभाडे, रिपब्लिक विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघडीचे जिल्हा अध्यक्ष गुणरत्न सोनवणे, भीम आर्मी चे मराठवाडा प्रमूख बाळू भाऊ वाघमारे,रिपब्लिकन सेनेचे ॲड. अतुल कांबळे,रिपब्लिकन बहुजन सेनेचे राहुल वडमारे,सूमित काळे, सोनु वाहुळ, राजू बनकर, कचरू गवळी आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages