पेट-२ बाबत मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 February 2021

पेट-२ बाबत मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल.

औरंगाबाद :

दि.१२ फेब्रुवारी रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पेट-२ परिक्षेबाबत एका परिपत्रकाद्वारे दि.२१ रोजी होणाऱ्या पेट-२ परीक्षा ही ऑनलाईन न घेता परीक्षा केंद्रावर ऑनलाईन होणार असल्याचे जाहीर केले होते कोविड 19 चा प्रादुर्भाव वाढत असल्याने विद्यापीठाने परीक्षा केंद्रावर ऑनलाईन स्वरूपात घेतल्याने विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो.

 दि.३०/१२/२०२१ रोजी विद्यापीठाने पेट परिक्षेबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या त्यात दोन्ही परीक्षा ह्या विद्यार्थ्याला घरून ऑनलाईन देण्याची मुभा देण्यात आली होती परंतु कोरोनाच्या सूचनांचा विचार न करता अचानक पणे सदरील परिपत्रक काढण्यात आल्याने ह्या विरोधात इसा यासिन फाउंडेशन च्या वतीने इसा यासिन व अतुल राजेंद्र कांबळे यांनी ऍड.जिया उल मुस्तफा यांच्या मार्फत रिट याचिका दाखल केली असून त्याचा क्रं. WPST 6214/2021 असा असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे.



No comments:

Post a Comment

Pages