औरंगाबाद :
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना विद्यापीठ फंडातून एकत्रित वेतनावर कायम करण्यात यावे, समान काम समान वेतन कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, संजय निंबाळकर समिती बरखास्त करण्यात यावी, थकीत पी.एफ. व्याजासहित देण्यात यावा, नवीन निविदा प्रक्रियेतील वयाची व शिक्षणाची अट रद्द करण्यात यावी या प्रमुख मागण्यानसाठी डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील भीमशक्ती रोजंदारी कर्मचारी युनियनच्या वतीने करण्यात आलेल्या लाक्षणिक धरणे आंदोलनास रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते श्रावण दादा गायकवाड, रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे मराठवाडा अध्यक्ष सचिन निकम, जिल्हाध्यक्ष ॲड.अतुल कांबळे, पँथर्स रिपब्लिकन विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष गुणरत्न सोनवणे, विकास रोडे, रत्नदीप कांबळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment