गायक लोककलावंतांनी आंबेडकरी चळवळ मजबूत केली - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 February 2021

गायक लोककलावंतांनी आंबेडकरी चळवळ मजबूत केली - केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.5 - लोकशाहीर; गायक ; लोककलावंतांनी  आंबेडकरी चळवळीला मजबूत केले. मी गायक कलावंतांची प्रबोधनपर गाणी रात्रभर ऐकली आहेत. माझे नेतृत्व मोठे करण्यात गायक लोक कलावंतांचा हात आहे.ये अंदर की बात है.. सारे कलाकार मेरे साथ है असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले केले . 

बोरिवली गोराई येथे  डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक बहुउद्देशीय सांस्कृतिक केंद्र च्या वतीने आयोजित कलावंत मेळाव्यात ना.रामदास आठवले बोलत होते.यावेळी ना. रामदास आठवले यांच्या हस्ते ज्येष्ठ गायक लोकशाहीर प्रभाकर पोखरीकर यांचा महाराष्ट्र भूषण गायक पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कलावंत मेळाव्यात अनेक कलाकार समाज सेवक यांचा ना रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यात कवी गीतकार सुखलाल इंगळे; गायिका प्रज्ञा इंगळे; रमेश गायकवाड; कविता पुणेकर;अनुप्रिया खोब्रागडे;मधुकर गवई; संदीप जुंबडे; दत्ता जाधव;  अशोक अभंगे; आदींचा समावेश होता. यावेळी रिपाइंचे गौतम सोनवणे; ऍड.अभया सोनवणे; हरिहर यादव; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.              

No comments:

Post a Comment

Pages