किनवट तालुक्यातील 103 ग्रामपंचायती अनु.जमातीसाठी पूर्वीसारख्याच राखीव ; यापैकी 52 ग्रा.पं.अनु.जमातीच्या महिला तर इतर 17 ग्राम पंचायतींचा कारभार महिला सांभाळणार - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 5 February 2021

किनवट तालुक्यातील 103 ग्रामपंचायती अनु.जमातीसाठी पूर्वीसारख्याच राखीव ; यापैकी 52 ग्रा.पं.अनु.जमातीच्या महिला तर इतर 17 ग्राम पंचायतींचा कारभार महिला सांभाळणार


किनवट,(प्रतिनिधी) :   तालुक्यातील 134 ग्रामपंचायतींच्या सन 2020-2025 या कालावधीकरिता  सरपंचपदाचे लांबलेले आरक्षण अखेर मंगळवारी (दि.02) जाहीर करण्यात आले. विशेषबाब म्हणजे निवडणुकी अगोदर काढण्यात आलेल्या आरक्षणातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती पदांचे आरक्षण कायम ठेवण्यात आले असून, नागरिकांचा मागास प्रवर्ग, व सर्वसाधारण (खुला) प्रवर्गातील पूर्वीच्या पुरुष व महिला आरक्षणात अंशत: बदल झालेला आहे.


          तहसील कार्यालयातील सभागृहात तहसीलदार उत्तम कागणे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीची चिठ्ठी  कैवल्य कांबळे या इयत्ता दुसरीत शिकणार्‍या विद्यार्थ्याच्या हस्ते काढण्यात आली. ग्रा.पं.निवडणुकीपूर्वी 19 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर झालेल्या एकूण 134 ग्रा.पं.च्या आरक्षणातील अनुसूचित क्षेत्र (पेसातील) 51 ग्रा.पं.या अनुसूचित जमातीसाठी व 51 ग्रा.पं.अनुसूचित जमाती महिलांसाठी आरक्षित केलेल्या होत्या. शिवाय बिगर अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती महिलासाठी ईरेगाव, अनुसूचित जातीसाठी आरक्षित चिखली ई. व अनुसूचित जाती महिलांसाठी  ईस्लापूर व रिठा ग्रा.पं. आरक्षित होते. या सर्व 106 ग्रामपंचायती मंगळवारच्या  सोडतीत जशाच्या तशा कायम राहिल्यात.  उर्वरीत 28 ग्रामपंचायतींच्या पूर्वीच्या ना.मा.प्र. व सर्वसाधारण प्रवर्गामधील ग्रा.पं.च्या आरक्षणामध्ये या नवीन काढलेल्या सोडतीत किंचितसे झालेले बदल  पुढीलप्रमाणे आहेत.


   नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव एकूण चार जागा : मरकागुडा, मूळझरा, मारलागुंडा, अप्पारावपेठ ; नामाप्र.महिला साठी राखीव एकूण पाच जागा : वाळकी बु., मानसिंगनाईक तांडा, अंबाडी तांडा, गोंडेमहागाव, भिसी; सर्वसाधारण खुला प्रवर्गासाठी एकूण 9 जागा : पांगरी, कंचली,  गोंडजेवली, दयाल धानोरा, नंदगाव तांडा, मलकजाम तांडा, तोटंबा, नंदगाव, जरूरतांडा;  सर्वसाधारण खुला प्रवर्गातील महिलासाठी राखीव एकूण 10 जागा : मलकजाम, पांगरपहाड, कोसमेट, आंदबोरी ई., शिवणी, फुलेनगर, दीपलानाईक तांडा, मोहाडा, बुधवारपेठ, रोडानाईक तांडा.


    सोडतीच्या प्रसंगी नायब तहसीलदार महम्मद रफीक, अनिता कोलगणे, एम.बी.लोखंडे, सर्वेश मेश्राम,  निवडणूक विभागाचे नितीन शिंदे व अशोक कांबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.


      अनुसूचित क्षेत्र (पेसा) मधील अनुसूचित जमाती मधील (एसटी प्रवर्ग )51 आरक्षित ग्राम पंचायतींची नावे पुढीलप्रमाणे : आंजी, बोधडी (बु), बोथ, भूलजा, भंडारवाडी, चिंचखेड, चिखली (बु), चिखली (खु), दिग्रस / चंद्रपूर, दरसांगवी (सि), दाभाडी, धानोरा ( सी ),धामनदरी, डोंगरगाव (चि), गौरी, जरूर, कोल्हारी, मारेगाव (व), मारेगाव (खा), मलकापूर / खेरडा, माळकोल्हारी, नागापूर, नागझरी, निराळा, निराळा तांडा, पिंपळगाव (सि ), पारडी (खु), परोटी, पिंपरी, पिंपरफोडी, पांधरा, प्रधानसांगवी, राजगड तांडा, शिरपूर, सारखणी, कनकवाडी, मलकवाडी, कोपरा, कुपटी ( बु ), कोठारी (सि ), कमठाला, उनकदेव,लिंगी, माळबोरगाव, सक्रूनाईक तांडा, वडोली, यंदा /पेंदा, कोठारी (चि ), सिंदगी ),मो रामपूर/ भामपुर, सालाईगुडा.


      अनुसूचित क्षेत्र (पेसा) मधील अनुसूचित जमातीमधील (एसटी प्रवर्ग) 51 महिला आरक्षित ग्राम पंचायतींची नावे पुढीलप्रमाणे : सावरी, मदनापूर (चि), आंदबोरी (चि), दहेली तांडा, देवला नाईक तांडा, बेंदी तांडा, परसराम नाईक तांडा, मोहपूर,पळशी, बेल्लोरी (धा), शनिवारपेठ, दुन्ड्रा, बेंदी, बोधडी (खु), दरसांगवी (चि), कनकी, सिंगोडा, दिगडी(मं), उमरी (बा), दहेली, राजगड, मांडवा, निचपूर, पाटोदा (खू), तल्हारी, पार्डी (सि), घोटी, दहेगाव, खंबाळा, पिंपळशेंडा, कुपटी (खु), पाथरी, आमडी, मांडवी, पाटोदा (बु),वझरा (बु), घोगरवाडी, करंजी(ई), लोणी, थारा, सिंगारवाडी, अंबाडी, भिमपूर, पिंपळगाव (कि ), टेंभी, जवरला, जलधारा, सावरगाव तांडा, बेल्लोरी(ज), भिलगाव, गोकुंदा.

No comments:

Post a Comment

Pages