२०२०-२१ च्या शैक्षणिक बजेट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मॅटरीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतूद रद्द करू नये - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 1 February 2021

२०२०-२१ च्या शैक्षणिक बजेट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मॅटरीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतूद रद्द करू नये

 

औरंगाबाद:

सम्यक विद्यार्थी आंदोलन औरंगाबाद जिल्हा कमिटीच्या वतीने २०२०-२१ च्या शैक्षणिक बजेट मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या मॅटरीकोत्तर शिष्यवृत्तीची तरतूद रद्द करू नये करिता जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्र सरकारला निवेदन देण्यात आले. 

     आज दि.०१ फेब्रुवारी २०२०  सोमवार रोजी केंद्रीय बजेट मध्ये मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी तरतूद करण्यासाठी आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती वाचविण्यासाठी २०२१-२०२२ च्या केन्द्रीय बजेटमध्ये शिष्यवृत्तीची तरतूद करण्यासाठी मा.पंतप्रधान यांना     उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी मा. संजीव जाधवन यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित प्रकाश इंगळे,अनिल दिपके, अविनाश सावंत,जयश्री शिर्के, संकेत कांबळे ,ऋषी कांबळे, सागर धोडपकर सिद्धार्थ कांबळे इ. उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages