मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विभागस्तरीय दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन संपन्न.. कवीसंमेलनात संविधानाचा जागर.. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 31 January 2021

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विभागस्तरीय दोन दिवसीय शिक्षक साहित्य संमेलन संपन्न.. कवीसंमेलनात संविधानाचा जागर.. अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंचचा उपक्रम

औरंगाबाद ( प्रतिनिधी ):

प्रजासत्ताक दिन व मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा निमित्ताने अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंच महाराष्ट्र, विभाग औरंगाबाद आयोजित विभागस्तरीय दोन दिवसीय ऑनलाईन शिक्षक साहित्य संमेलन  २८ व २९ जानेवारीला संपन्न झाले. कविसंमेलन व कथाकथनामधून शिक्षकांच्या अभिव्यक्तिला प्रोत्साहन देवून कविसंमेलनात संविधानाचा जागर करण्यात आला. 


कविसंमेलनाचे उद्घाटन

संस्थापक अध्यक्ष तथा राज्याध्यक्ष नटराज मोरे  यांनी  केले तर विभागीय अध्यक्ष रमेश मुनेश्वर हे कवी संमेलनाध्यक्ष होते तर प्रमुख पाहूणे म्हणून राज्य प्रसिद्धी प्रमुख सचिन कुसनाळे आणि  जिल्हाध्यक्ष पदमाकर वाघरुळकर (औरंगाबाद), प्रा.कल्याण राऊत (लातूर), डॉ.नंदकिशोर डंबाळे (जालना), मिलिंद जाधव (नांदेड), शिवशंकर डोईजड (परभणी), शिवाजी जगताप (बीड), नानासाहेब बोराडे (उस्मानाबाद), शिवाजी निळकंठे (हिंगोली) उपस्थित होते.

" काळानुसार  कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल होत असला तरी गुणवत्ता मात्र टिकून आहे. शिक्षकांच्या कला गुणांना वाव मिळावा ह्या मुख्य उद्देशाने या मंडळाची स्थापना झाली आहे.

विभागस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचा आदर्श घेऊन राज्यस्तरीय कथाकथन संमेलन घेऊया " असं राज्याध्यक्ष नटराज मोरे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य पूरस्कार प्राप्त शिक्षक रमेश मुनेश्वर यांनी केले.


'कविता संविधानाच्या' या ऑनलाईन कवि संमेलनात शिल्पा वाघमारे (बीड), चंद्रकांत कदम (नांदेड), बाबुराव पाईकराव (हिंगोली), सविता ढाकणे (बीड), सुर्यभान खंदारे (नांदेड), अर्चना गरूड (किनवट), महेंद्र नरवाडे (नांदेड), बि.आर. इंदूरवार (किनवट), रुपेश मुनेश्वर (नांदेड), रामस्वरूप मडावी (किनवट), राजू भगत (माहूर), प्रल्हाद जोंधळे (भोकर), राणी नेम्मानिवार (नांदेड) यांनी सहभागी होऊन दर्जेदार रचना सादर करून श्रोत्यांची दाद मिळवली. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नांदेड जिल्हासचिव रुपेश मुनेश्वर यांनी केले तर आभार राणी नेम्मानिवार या कवयित्रीने मानले. 


दुसऱ्या दिवसी कथाकथन घेण्यात आले. यामध्ये कथाकार धनंजय गुडसूरकर (लातूर) यांनी 'चोरी झालीच नाही' ही हृदयस्पर्शी शैक्षणिक कथा सादर केली. महेंद्र नरवाडे (नांदेड) यांनी 'कायापालट' वास्तव कथा सादर केली. अंबादास इंगोले ( हिंगोली) यांनी 'हगणदारी मुक्त गाव' ही ग्रामीण कथा सादर केली. भूमय्या इंदूरवार (नांदेड) यांनी 'दावं' ही करूण कथा सादर केली. प्रल्हाद जोंधळे (भोकर) यांनी सत्यकथा सादर केली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेश मुनेश्वर यांनी 'जीवाची मंबई झाली ' ही हदयस्पर्शी कथा सादर केली. कथाकारांच्या एकापेक्षा एक सरस कथा सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणली. 


या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्तंभलेखक तथा कथाकार नासा येवतीकर यांनी केले. तर आभार नांदेड जिल्हाध्यक्ष तथा चित्रकार मिलिंद जाधव यांनी केले.

कार्यक्रमास साहित्यिक भगवान जोगदंड, राजा तामगाडगे, पिराजी वाठोरे ,पांडूरंग केंद्रे, आशाताई पाटील , साहेबराव डोंगरे, यांच्यासह  बहुसंख्य श्रोते ऑनलाईन उपस्थित होते. ऑनलाईन कार्यक्रमासाठी  तांत्रिक सहकार्य रुपेश मुनेश्वर, मिलिंद जाधव आदीनी केले.

No comments:

Post a Comment

Pages