हातावर पोट आसणाऱ्या गोरगरीबानी दहा दिवस कस जगायच जिल्हाधिकारी साहेब. ग्रामीण भागातील गोरगरीब. जनतेचा सवाल. - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday, 26 March 2021

हातावर पोट आसणाऱ्या गोरगरीबानी दहा दिवस कस जगायच जिल्हाधिकारी साहेब. ग्रामीण भागातील गोरगरीब. जनतेचा सवाल.

हिमायतनगर (दिलीपराव शिंदे )

नांदेड. जिल्ह्यात कोरोना रूग्णाची संख्या दिवसन दिवस वाढत चालल्याने जिल्हाधिकारी डाॅ.विपीन विटणकर साहेब यांनी 26 मार्च ते 4 एप्रिल दहा दिवसाचा नांदेड जिल्ह्यात कडकडीत लॉकडाऊन जाहीर केला आसल्याने हातावर पोट आसणाऱ्या सर्व सामान्य गोरगरीब जनतेने दहा दिवस जगायचे कसे आसा सवला या जनतेतुन उपस्थित केला जात आहे.


गत वर्षी मार्च महीन्यात महाराष्ट्रात कोरोनाने शिरकाव केल्याने त्याला आटोक्यात आण्या करीता तब्बल सहा महिनेचा लॉकडाऊन पडला होता यात हातावर पोट आसणाऱ्या जनतेचे कोरोना रोगा पेक्षा उपासमारीने खुप मोठे हाल झाले होते.हे चित्र सर्वानी पाहीले आसुन ही कोरोना रोगावर लॉकडाऊन हा पर्याय नसताना देखील लॉकडाऊन टाकल्याने हातावर पोट आसणाऱ्या सर्व सामान्य गोरगरीब जनतेने जगायचे तरी कसे आसा सवाल या जनतेतुन जिल्हाधिकारी याना उपस्थित केला जात आहे.दिवस भर काम केले तरच घरच्या लेकराबाळा देान घास खावु घालता येता मात्र लॉकडाऊन मुळे तर खुप मोठी आडचण निर्माण होणार आहे कारण दिवस भर हाताला काम नाही मिळाले तर लेकराबाळा सह जगायच कस या चिंतेत ही जनता  आडकली आहे तरी साहेब दहा दिवसा करता या गोरगरीब जनतेला दोन वेळच पोटाला खाण्याची सोय तरी करावी जेने करून लॉकडाऊन पेक्षा उपासबळी तरी जाणार नाही.



जिल्हाधिकाऱ्यानी दहा दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केल्याने आम्हच्या सारख्या सर्व सामान्य गोरगरीब जनतेने जगायच तरी कस व साहेब

     -  संजय मुधोळकर हिमायतनगर


आदीच दोन तीन दिवस पावसानी हजेरी लावल्याने हाताला मिळणारे काम बद पडले त्यात दहा दिवस लॉकडाऊन पडल्याने आम्ही दहा दिवस काय खायचे.

          -    लालु पाबळे खरमुरे गाडीवाले हिमायतनगर.


जिल्हाधिकारी साहेबानी शासकिय कर्मचाऱ्याचा दहा दिवसाचा पगार हा हातावर पोट आसणाऱ्या गोरगरीब जनतेला जगण्या करता अर्थिक मदत द्या.

        - सुभाषराव दारवंडे सामाजीक कार्यकर्ते, हिमायतनगर

No comments:

Post a Comment

Pages