राष्ट्रहितासाठी अ. भा. रिपब्लिकन पक्ष जनमानसात रुजूवा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 March 2021

राष्ट्रहितासाठी अ. भा. रिपब्लिकन पक्ष जनमानसात रुजूवा

 


चंद्रपुर:

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर कोरोनाचे  सर्व नियम पळून पद्मापूर येथे आयोजित करण्यात आले होते.अध्यक्षय भाषणातून पक्षाध्यक्ष प्रवीण हेमचंद्र खोब्रागडे यांनी पक्षाची प्रतिमा  जनमानसात उंचवण्यासाठी ,गावात-वार्डात प्रचार प्रसार करणे,सर्व जाती धर्म व पंथांच्या लोकांचे प्रश्नांना वाचा फोडणे या सोबतच,कार्यक्रम व आंदोलना पक्ष बांधणी करणे यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत मांडले.प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत सुनील खोब्रागडे,मुंबई यांनी शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा सोबतीला घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिपब्लिकन संकल्पनेची प्रामाणिकपणे भारतीय जनतेच्या मनात रुजवणे गरचे आहे असे सांगितले.पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी बाबासाहेबांच्या संकल्पनेतील  रिपब्लिकन  पक्षाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पोहचवले त्यांचा वारसा चालवत भारतीय संविधानाला वाचवण्याची भूमिका व स्वतंत्र,समता, बंधुता,न्याय या तत्वावर आधारित भारतीय समाज घडविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे आव्हान केले.या वेळी पक्षचे जेष्ठ नेते अशोक निमगडे व समता सैनिक दलाचे अध्यक्ष अशोक टेभरे यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे प्रास्ताविक  राजू खोब्रागडे व आभार पक्षाचे जिल्हाअध्यक्ष प्रेमदास बोरकर यांनी केले.

या वेळी गडचिरोली येथून अशोक  खंडारे,हंसराज उंदिरवडे,हेमंत सहारे,प्रतिमा बनसोड, नीता सहारे, अशोक खोब्रागडे,ज्योती उंदिरवडे,वनमला झाडे,ज्योती चौधरी ,धर्मेंद्र वंजारी,सुरेश शंभरकर,मृणाल कांबळे,लीना खोब्रागडे,ज्योती शिवणकर,निर्मला नगराळे,प्रेरणा करमरकर,अश्विनी खोब्रागडे,सुनीता गायकवाड,हेमलता वाळके,नागसेन वानखेडे,राजकुमार जवादे,प्रा.टी. डी. कोसे,शंकर वाल्हेकर,प्रतीक डोरलीकर, राजस खोब्रागडे, शुभम शेंडे,मुन्ना आवळे,सुधीर ढोरे, उपसतित होते.

No comments:

Post a Comment

Pages