सुरज दामरेच्या पत्रास जशास तसे उत्तर देणारे इंगळे यांचे कुलगुरूना पत्र! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 March 2021

सुरज दामरेच्या पत्रास जशास तसे उत्तर देणारे इंगळे यांचे कुलगुरूना पत्र!


नांदेड : विद्यापीठात बंटी व बबलीचा धुमाकूळ ही बातमी वृत्त पत्रातून प्रकाशित झाल्यानंतर  चिडून सुरज दामरे  यांनी आपल्यालाच खुलासा मागितला आहे, असा  खुलासा मागण्याची त्यांचा दर्जा आहे का (Protocol/hirarki )नसेल तर कुलगुरू या पदाची बदनामी केल्याबद्दल त्याच्या विरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा विद्यापीठाने दाखल करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य स्वप्निल इंगळे पाटील यांनी केले आहे. 


तसेच बंटी-बबली व तिसरा असे मालक म्हणवणाऱ्यांनी कट करून माझ्या विरुद्ध हे पत्रक काढले आहे, असा माझा आरोप आहे त्याची व दामरे यांनी आता पर्यंत केलेल्या सर्व आरोपांची चौकशी करावी दामरे यांना ही माहीती पुरवणाऱ्या विद्यापीठातील कर्मचारी, अधिकारी यांची चौकशी करावी. निरनिराळ्या प्रकारे विद्यापीठाच्या अधिकार्‍यांना ब्लॅकमेलिंग (वेठीस धरणे )करणे  हा चमचेगिरी करणाऱ्या काही लोकांचा धंदा झाला आहे. 


दरम्यान, स्वतः  गैरप्रकार करून  इतरांना  शहाणपणा शिकवत आहेत. अशांचा बंदोबस्त व्हावा विद्यापीठ हार्दिक बंदोबस्त करत नसेल तर आम्ही त्यास समर्थ आहोत,

दामरे हे गेल्या 3-4वर्षा पासून सतत विद्यापीठाला बदनाम करणारे कृत्य करत आहेत. 


अगोदर त्यांनी परीक्षा विभाग विषयी तक्रारी केल्या त्याची चौकशी झाली निष्पन्न काहीच झाले नाही त्या प्रकरणात विद्यापीठ व परीक्षा विभागाची नाहक बदनामी झाली. त्यातून कोणत्या कॉलेज चे काय साध्य करावयाचे होते त्याची ही चौकशी करण्यात यावी.


तसेच अधिष्ठाता नियुक्ती, परीक्षा पद्धती, कुलसचिव प्रकरणे, covid लॅब, हरित विद्यापीठ, विद्यापीठातील बांधकामे, रस्त्याची कामे, बंधारे कामे या व दामरे यांनी इतर केलेल्या सर्व प्रकारणांची चौकशी करावि, विद्यापीठात पृष्टांकित केलेले कागद त्यांच्याकडे कसे गेले याची चौकशी करावी विद्यापीठातील कोण अधिकारी कर्मचारी हे करत आहेत त्यांची चौकशी करावी व निलंबन करावे. सफाई कामगार प्रकरणी मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या उपोषनाची चौकशी करावी अशी माझी मागणी आहे. 


विद्यापीठात मनमानी करायची कोणी विरोध केला की त्याचे तोंड गप्प करण्याचा प्रयत्न करायचा हा लोकशाही मार्ग नाही. दामरे यांच्या वर पुणे विद्यापीठात परीक्षा गैर प्रकारात दंड झाला आहे त्याच्यावर कारवाई करण्याची मी मागणी केली आहे त्या मुळे चिडून त्यांनी हे पत्रक काढले आहे. 

उपोषण मला ही करता येते, आंदोलन मला ही करता येते हे फक्त मी येथे नोंद करत आहे, माझ्या या पत्राची गांभीर्याने नोंद घ्यावी अन्यथा विद्यापीठासमोर आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्य स्वप्निल इंगळे पाटील यांनी दिला आहे.


No comments:

Post a Comment

Pages