हल्ला मह्ल्ला मिरवणुकीत पोलिसांवरच हल्ला, अनेक जण गंभीर, गाड्या आणि मोबाईलची तोडफोड परिस्थिती आटोक्यात, पण शहरात तणावपूर्ण शांतता - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 29 March 2021

हल्ला मह्ल्ला मिरवणुकीत पोलिसांवरच हल्ला, अनेक जण गंभीर, गाड्या आणि मोबाईलची तोडफोड परिस्थिती आटोक्यात, पण शहरात तणावपूर्ण शांतता


नांदेड_दि 29 | जिल्ह्यमध्ये कोरोना प्रादुर्भावच्या अनुषंगाने 5 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन असल्याने होळी नंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवनुकीलाही परवानगी नव्हती. पण रविवार दि 29 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले होते . गुरुद्वारा चौरस्त्यावरही पोलीस तैनात होते.चौरस्त्यावर बैरिकेटिंग करण्यात आली होती.पोलीसांशी हुज्जत घालून काही लोकांनी बैरिकेटिंग तोडली. त्यामुळे तनाव निर्माण झाला.सध्या परिस्थीती नियंत्रणात असली तरी तनावपूर्ण वातावरण आहे... चौरस्त्यावर घटनेचे शूटिंग करणाऱ्या अनेकांचे मोबाइल फोडन्यात आले.  यावेळी पोलीस उपअधीक्षक यांची गाडी फोडण्यात आली.

नांदेड मध्ये दररोज कोरोना चे एक हजार हुन अधिक रुग्ण सापडत असून 17 ते 18 जणांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे गुरुवार पासून टाळे बंदी करण्यात आली आहे. परंतु त्यानंतर ही आज शीख समाजाच्या वतीने हल्ला बोल मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंध केल्यानंतर पोलिसांवर हल्ला करण्यात आला, त्यात 10 पोलीस जखमी झाले. तर 30 ते 40 मोबाईल फोडण्यात आले, पोलीस उपअधीक्षक यांची गाडी ही फोडण्यात आली.


पोलीस अधीक्षकांवर  हल्ला


नांदेडमद्धे हल्ला मह्ल्ला मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला करण्यात आला.पोलीस अधीक्षक यांच्यावर तलवारीने करण्यात आलेल्या हल्ल्यात त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला आणि दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत.सोबतच पोलिसांच्या अनेक गाड्या जमावातील काही जणांनी फोडून टाकल्या आहेत.

कोवीड नियमावली जाहीर असतांना आलेला शिमगा सण पोलिसांच्या जीवावर बेतला होता. आज गुरुद्वारामध्ये दरवर्षी प्रमाणे होळी आणि हल्ला मह्ल्ला साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अनेक बैठकांचे आयोजन केले होते.त्यात गुरुद्वारा परिसरात प्रतीकात्मक हल्ला मह्ल्ला सण साजरा करू असे सर्वानी बैठकीत सांगितले होते. त्यानुसार होळी सण साजरा झाला पण आज निघणारी हल्ला मह्ल्ला मिरवणूक आणि शिमगा पोलिसांच्या जीवावर बेतला. दुपारी नेहमी प्रमाणे सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले. गुरुद्वाराची सर्व गेट कुलूप लावून बंद करण्यात आली होती.सर्व धार्मिक प्रक्रिया पार पडल्यानंतर काही टोळक्याने तेथे संतांसोबत सुद्धा अभद्र व्यवहार करून बंद गेटचे कुलूप तोडले. आणि हल्ला मह्ल्ला मिरवणूक बाहेर आली.रस्ते सुनसान होते. तरीही हल्ला मह्ल्ला मिरवणूक बाहेर आल्यावर अनेक जण त्यात सहभागी झाले. 

रस्त्यावर आलेल्या मिरवणुकीत सामील असलेल्या टोळक्यातील एका समाजकंटकाने पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर तलवारीने प्रहार केला.त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी अत्यंत जलदगतीने मध्ये धाव घेतली आणि ती तलवार दिनेश पांडे यांच्या पाठीला चिरून गेली.जखमेतून दिनेश पांडे यांचे फुफ्फुस दिसत होते यावरून जखमेची तीव्रता लक्षात येते. त्यांनतर अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे,विजय कबाडे,पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,संदीप शिवले यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी या हल्ल्यात थोडक्यात वाचले. पोलिसांच्या अनेक गाड्या कंटकांनी पूर्णपणे फोडून टाकल्या आहेत.घडलेली घटना समजताच  पोलीस उप महानिरीक्षक निसार तांबोळी,जिल्हाधिकारी डॉ.विपीन सुद्धा चिखलवाडी कॉर्नर येथे पोहचले होते.

सध्या शहरातील वजीराबाद परिसरामध्ये  तणावपूर्ण शांतता असून हल्लेखोरांची धरपकड सुरू आहे रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. 


 


No comments:

Post a Comment

Pages