पत्रकाराचा अवमान केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांच्यावर कार्यवाही करा;किनवट सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 8 March 2021

पत्रकाराचा अवमान केल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक रविंद्र डोंगरे यांच्यावर कार्यवाही करा;किनवट सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

किनवट/प्रतिनिधी:

कुर्डूवाडी येथील दैनिक साहित्यसम्राट चे विभागीय संपादक राजाराम बोराडे यांना अपशब्द वापरून अपमान केल्याबद्दल कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे  यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन किनवटचे मा. सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ संलग्नित इलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया, तालुका किनवट च्या वतीने देण्यात आले आहे.

निवेदनात  असे म्हटले आहे की, कुर्डवाडी येथील एका जुन्या प्रकरणा ची माहिती संबंधित दैनिक साहित्यसम्राट चे विभागीय संपादक राजाराम बोराडे हे कुर्डवाडी पोलीस स्टेशन मध्ये  गेले असता येथील पोलिस निरीक्षक रवींद्र डोंगरे यांनी अत्यंत हीन वागणूक देत अपशब्द वापरून त्यांचा व लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या पत्रकारितेचा अवमान केला आहे तेव्हा आशा मग्रूर अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले आहे. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंद भालेराव,मार्गदर्शक नसीर तगाले,किनवट तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत मुंडे, ता. कार्याध्यक्ष आशिष शेळके,तालुका उपाध्यक्ष शेख अतिफ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages