शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 16 March 2021

शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा

नांदेड,  दि. 16 :- दि. महाराष्ट्र स्टेट को-ऑप मार्केटिंग फेडरेशन लि. मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांनी सन 2020-21 आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासकीय हरभरा खरेदी केंद्र अर्धापूर येथे नुकतीच भेट देऊन खरेदीबाबत विविध सूचना दिल्या. हरभराचा शासकीय हमीभाव 5 हजार 100 रुपये प्रती क्विंटल असून खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे शेतकऱ्यांना आठ ते दहा दिवसात अदा केली जातील. सध्या खुल्या बाजारात हरभरा या शेतमालास हमी भावापेक्षा कमी दर असल्याने शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावर हरभरा विक्री करुन हमीभाव योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले. 


No comments:

Post a Comment

Pages