▪️जिल्हयात 5 किंवा 5 पेक्षा जास्त लोक सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास आदेशाद्वारे मनाई.
▪️सार्वजनिक / खाजगी क्रिडांगणे / मोकळया जागा, उद्याने, बगीचे हे संपूर्णतः बंद
▪️उपहारगृह (कोविड-19 साठी वापरात असलेले वगळून) लॉज, हॉटेल्स, बार, रिसॉर्ट, मॉल, बाजार, मार्केट संपूर्णत बंद.
▪️घरपोच पुरवठा करता येईल. (डिलेव्हरी बॉय जवळ ओळखपत्र आवश्यक)
▪️सर्व केश कर्तनालय, सलून, ब्युटी पार्लर दुकाने संपूर्णतः बंद.
▪️मटन, चिकन, अंडी, मासे इत्यादीची विक्री संपूर्णतः बंद. (घरपोच सेवा देता येईल.)
▪️शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णतः बंद.
▪️सार्वजनिक व खाजगी दोन चाकी, तीन चाकी व चार चाकी संपूर्णतः बंद (अत्यावश्यक सेवेतील वाहने, पूर्व परवानगी प्राप्त वाहने व वैद्यकीय कारणास्तव प्रवासासाठी खाजगी वाहनाचा वापर अनुज्ञेय)
▪️अत्यावश्यक / वैद्यकिय कारणास्तव अॅटोमध्ये 2 व्यक्तींना परवानगी.
▪️सार्वजनिक व खाजगी बस सेवा, ट्रक, टेम्पो, ट्रेलर, ट्रॅक्टर इत्यादीसाठी संपूर्णतः बंद.
▪️कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे काम करणारे नांदेड महानगरपालिकेचे, पोलिस विभागाचे व राज्य व केंद्रीय विभागाचे विनिर्दिष्ट कर्मचारी व वाहने तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी व वाहनांना या आदेशातून वगळण्यात आले.
▪️अत्यावश्यक सेवा व वस्तु यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतूक यांना या आदेशातून वगळण्यात येत आहे.
▪️सर्व प्रकारचे बांधकाम / कंस्ट्रक्शनची कामे संपूर्णतः बंद.
▪️बांधकामाच्या जागेवर कामगारांची निवास व्यवस्था असेल तरच त्यांना काम सुरु ठेवता येईल.
▪️सर्व चित्रपटगृह, व्यायामशाळा,
जलतरण तलाव, करमणूक उद्योग, नाटयगृह, बार, प्रेक्षागृह संपूर्णतः बंद.
▪️मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ संपूर्णतः बंद. केवळ नोंदणीकृत विवाह अनुज्ञेय.
▪️सामाजीक / राजकीय / क्रिडा / मनोरंजन / सांस्कृतीक / धार्मीक कार्यक्रम व सभा संपूर्णतःबंद.
▪️धार्मीक स्थळे / सार्वजनिक प्रार्थनास्थळे संपूर्णतः बंद.
▪️नांदेड शहरातील सर्व खाजगी कार्यालये बंद. (परंतू 31 मार्च क्लीअरींगचे कामे दर्शनी दरवाजा बंद ठेवून करता येतील.)
▪️सर्व शासकीय कार्यालयासमोर मोर्चे,धरणे आंदोलन उपोषण आदीवर निर्बंध राहतील.
▪️31 मार्च अखेरीस ताळमेळ, बॅकेत चलन भरण्याची कामे (दुकानाचे शटर बंद करून आत क्लोजींगचे कामे करण्यास दोन-तीन व्यक्तीस परवानगी.)
▪️ग्राहकांना प्रवेशास परवानगी राहणार नाही.
▪️सर्व किराणा दुकाने हे दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु राहतील. किरकोळ विक्रेत्यांना दुपारी 12 पर्यंत दुकानातून घरपोच किराणा मालाचा पुरवठा करता येईल.
▪️दुध विक्री व वितरण सकाळी 10 वाजेपर्यंत घरपोच अनुज्ञेय राहील.
▪️दुध संकलन नेहमीप्रमाणे विहीत वेळेनुसार सुरु ठेवता येईल.
▪️भाजीपाला व फळांची ठोक विक्री सकाळी 7 ते 10 यावेळेत.
▪️किरकोळ विक्रेते एका ठिकाणी न थांबता गल्लोगल्लीत फिरून सकाळी 7 ते दुपारी 1 यावेळेतच विक्री करतील.
▪️सर्व खाजगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा त्यांच्या नियमीत वेळेनुसार सुरु राहतील.
▪️सर्व रुग्णालये व रुग्णालयाशी निगडीत सेवा आस्थापना त्यांचे नियमीत वेळेनुसार सुरु.
▪️कोणतेही रुग्णालय लॉकडाऊनचा आधार घेऊन रुग्णांना आवश्यक सेवा नाकरणार नाही. अन्यथा संबंधित संस्था कारवाईस पात्र राहील.
▪️ऑनलाईन औषध वितरण सेवा व दवाखान्याबाबत असलेली सर्व औषध विक्री दुकाने दिनांक 4 एप्रिल 2021 पर्यंत 24 तास सुरु ठेवता येतील.
▪️ई-कॉमर्स सेवा जसे ॲमेझॉन, फ्लिपकार्ट व तत्सम सेवा (अत्यावश्यक व इतर ) घरपोच सुरु राहतील.
▪️सर्व मा. न्यायालये व राज्य शासनाचे / केंद्र शासनाचे कार्यालय तसेच शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक संस्थेची कार्यालये शासन निर्देशानुसार विहीत कर्मचारी मर्यादेनुसार सुरु ठेवता येतील.
▪️शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरण्यात यावा.
▪️शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक पासची आवश्यकता राहणार नाही परंतू स्वतःचे ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक राहील.
▪️पेट्रोलपंप व गॅसपंप सुरु राहतील. या ठिकाणी सेवेतील (पोलीस, आरोग्य विभाग इतर शासकीय विभाग) वाहने, अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे शासकीय कर्मचारी यांचे वाहने,अत्यावश्यक सेवा पुरविणारे खाजगी आस्थापनाचे(घरगुती गॅस वितरक, पिण्याचे पाणी पुरविणारे, इत्यादी) वाहने यांनाच इंधन पुरवठा करण्यात येईल.
▪️स्वतःचे ओळखपत्र, गणवेश असणे आवश्यक राहील.
▪️एलपीजी गॅस सेवा ही घरपोच गॅस वितरण नियमानुसार राहील. कर्मचाऱ्यांना गणवेश, ओळखपत्र बंधनकारक आहे.
▪️सॉ-मील (लाकडाचे दुकान) केवळ स्मशानभुमीच्या बाजुला असेल तरच सुरु ठेवता येईल. इतर ठिकाणी बंद राहतील.
▪️औद्योगीक व इतर वस्तुची पुरवठा साखळी अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक अशी स्थानिक, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतुक, शासकीय नियमानुसार सुरु राहील.
▪️दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिक यांची छपाई व वितरण व्यवस्था तसेच डिजीटल / प्रिंटमिडीया यांची कार्यालय शासकीय नियमानुसार सुरु राहतील. वर्तमानपत्रांचे वितरण सकाळी 6 ते 9 यावेळेमध्येच अनुज्ञेय राहील.
▪️पाणीपुरवठा करणारे टॅंकरला नियमानुसार परवानगी राहील.
▪️संस्थात्मक अलगीकरण / विलगीकरण व कोव्हिड केअर सेंटर करता शासनाने ताब्यात घेतलेल्या व मान्यता दिलेल्या कार्यालयाच्या जागा, इमारती नियमानुसार सुरु राहतील.
▪️सर्व राष्ट्रीयकृत व आरबीआयने मान्यता दिलेल्या बॅंका नियमानुसार किमान मनुष्यबळासह सुरु राहतील. बॅंकेच्या इतर ग्राहक सेवा जसे ऑनलाईन, एटीएम सेवा सुरु राहतील.
▪️नांदेड जिल्ह्यातील मा. न्यायालयाचे कर्मचारी, अधिकरी, मा. न्यायाधीश, वकील, शासकीय राज्य / केंद्र शासनाचे कर्मचारी शासन अंगीकृत कर्मचारी, डॉक्टर नर्स, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, वर्तमानपत्र, प्रिंटीग व डिजीटल मिडीयाचे कर्मचारी, फार्मा व औषधी संबधित मेडीकल शॉपचे कर्मचारी, दुध विक्रेते, अत्यावश्यक सेवा जसे कृषी, बी-बियाणे, खते, गॅस वितरक,पाणी पुरवठा, आरोग्य व स्वच्छता करणारे शासकीय व खाजगी कामगार, अग्निशमन सेवा, जलनिःसारण तसेच पूर्व पावसाळी व पावसाळया दरम्यान करावयाची अत्यावश्यक कामे करणारे व वीज वहन व वितरण कंपनीचे कर्मचारी, महानगरपालिकचे कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच कंन्टेमेंट झोन करीता नियुक्त कर्मचारी यांनाच चारचाकी, दुचाकी (स्वतः करीता फक्त) वाहन वापरण्यास परवानगी राहील. या सर्व कर्मचारी / अधिकारी यांनी स्वतःचे कार्यालयाचे ओळखपत्र तसेच शासकीय कर्मचारी सोडून इतरांनी स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवावे. वाहन फक्त शासकीय कामासाठी अथवा कामाचे जबाबदारीनुसार व शासकीय अथवा संस्थेने दिलेल्या वेळेतच वापरता येईल.
▪️औषध व अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया आणि निर्यात उद्योग व त्याचे पुरवठादार नियमानुसार चालू राहतील.
▪️बी-बियाणे, शेतीसाठी लागणारे औषधे, रस्सी, ताडपत्रीची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
▪️अन्न प्रक्रिया व शेतमालाशी कृषि निगडीत प्रक्रिया उद्योग, कारखाने सुरु ठेवता येतील.
▪️कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळखपत्रे सोबत ठेवणे बंधनकारक राहील.
▪️माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आस्थापनांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय वापरावा.
▪️अत्यावश्यक वाहनांना साहित्य पुरविणारे अॅटोमोबाईल्स, शेतीसाठीचे फवारणी यंत्र दुरुस्ती दुकाने यांना सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत आस्थापना सुरु ठेवता येतील.
▪️सर्ववैद्यकीय, व्यवसायिक,
परिचारीका, पॅरामेडिकल कर्मचारी, सफाई कर्मचारी व अॅम्बुलन्स यांना जिल्ह्यातर्गत वाहतुकीसाठी परवानगी.
▪️वाहनांचे अधिकृत सर्विंस सेंटर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना (वैद्यकीय सेवेतील, पोलीस व इतर शासकीय यंत्रणेची वाहने) यांना सुविधा पुरवितील. त्यांच्या कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्र बंधनकारक राहील.
▪️वृध्द व आजारी व्यक्तीकरीता नियुक्त केलेले मदतनीस यांच्या सेवा सुरु राहतील.
▪️अंत्यविधीसाठी 20 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी असेल. शेतीच्या मशागतीस मुभा असेल. मग्रारोहयोची कामे सुरु राहतील. कामाच्या ठिकाणी शारीरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.
▪️स्वस्त धान्य दुकाने सुरु राहतील. ज्याठिकाणी ग्राहकांना आत प्रवेश देवून खरेदी केली जाते अशी सुपर मार्केटस् (डी मार्ट, सुपर मार्केट,नांदेड स्क्वेअर बाजार इत्यादी) बंद राहतील. परंतु ऑनलाईन, दूरध्वनी वरुन प्राप्त ऑर्डरनुसार दुपारी 12 वाजेपर्यंत घरपोच साहित्य वितरीत करता येईल.
▪️घरपोच सेवा पुरविणाऱ्या व्यक्तीस गणवेश व ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
▪️बाहेरगावी, परराज्य, देशात जाण्यासाठी रेल्वे, विमानाचे तिकीट बुकींग केले असेल त्यांना प्रवासास परवानगी असेल, सोबत ओळखपत्र व तिकीट असणे आवश्यक आहे.
▪️अत्यावश्यक सेवेशी निगडीत नसलेले कारखाने, उद्योग कामाच्या ठिकाणी मजुरांच्या राहण्याची व जेवणाची सोय असेल तरच सुरु ठेवता येतील.
▪️पाणी पुरवठा (जार, टॅंकर) दुपारी 12 वाजेपर्यंत सुरु ठेवता येतील.
▪️इंटरनेटसारख्या संपर्क साधनांसंबंधी सेवा पुरविणाऱ्या संस्थांना त्यांच्या आस्थापना आवश्यकतेनुसार सुरु ठेवता येईल.
▪️सर्व ऑनलाईन सेवा पुरवणिारे सीएससी नियमानुसार अनुज्ञेय असलेल्या वेळेप्रमाणे सुरु राहतील.
▪️अत्यावश्यक सेवेतील संस्था (सीएससी घरगुती गॅस वितरक, पेट्रोलपंप धारक इत्यादी ) यांना दैनिक व्यवहार किंवा पुरवठादार कंपनीशी आर्थिक व्यवहारासाठी बॅकेत ये-जा करणेसाठी व व्यवहार करणेसाठी परवानगी असेल.
▪️बॅकेतील व्यवहारासाठी ये-जा करणाऱ्या व्यक्तीस संस्थेचा गणवेश अथवा ओळखपत्र किंवा आवश्यकतेनुसार दोन्ही बाबी बंधनकारक राहतील.
▪️या आदेशात नमुद संपुर्ण निर्देशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्यक कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्यास पुढील यंत्रणेस प्राधिकृत करण्यात आले आहे. यात महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत. नगरपालिका, नगरपंचायत हद्दीत नगरपालिका, नगरपंचायत व पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत.
▪️गावपातळीवर ग्रामपंचायत व पोलीस विभागाचे संयुक्त पथक गठीत करावे. याप्रमाणे सर्व संबंधित यंत्रणेने पर्यवेक्षणासाठी गठीत केलेले पथकाचे आदेश संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांचेकडे सादर करावीत. संबंधित उपविभागीय दंडाधिकारी तथा (Incident Commander) यांची वरीलप्रमाणे आदेशाची अंमलबजावणीच्या अनुषंगाने संनियंत्रणाची जबाबदारी असेल.
▪️या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.
▪️आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था, अथवा समुह, भारतीय दंड संहिता 1860, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रियासंहिता 1973 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहील.
▪️आदेशाची अंमलबजावणी करताना सदभावनेने केलेल्या कृत्यासाठी कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांचे विरुध्द कार्यवाही केली जाणार नाही.
No comments:
Post a Comment