राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी ॲड. राहुल सोनकांबळे यांची नियुक्ती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 7 March 2021

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या तालुका अध्यक्षपदी ॲड. राहुल सोनकांबळे यांची नियुक्ती

 


किनवट, ता.७ : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या तालुकाध्यक्षपदी येथील ज्येष्ठ वकील राहुल देवराव सोनकांबळे यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कपिल के. जुन्नेकर यांनी एका पत्राद्वारे नुकतीच केली आहे. पत्रात श्री. जुन्नेकर यांनी नमूद केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार जयदेव अण्णा गायकवाड व प्रदेश उपाध्यक्ष पंडितराव कांबळे यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्ष बळकटीसाठी , फुले-शाहू-आंबेडकर व पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार जनसामान्यात पोहोचविण्यासाठी तसेच पक्षाची ध्येयधोरणे सर्वसामान्यापर्यंत पोचविण्यासाठी आपण सहकार्य करावे, अशी अपेक्षा पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. श्री. कांबळे यांच्या निवडीबद्दल किनवट वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट अरविंद चव्हाण, एडवोकेट आनंद वैद्य, एडवोकेट दिलीप काळे, अडवोकेट मिलिंद सरपे आदींनी कांबळे यांचे अभिनंदन केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages