नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक 2021 करिता भाजपचे बाबुराव केंद्रे ,सुरेश रंगेनवार ,संदीप केंद्रे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 March 2021

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक 2021 करिता भाजपचे बाबुराव केंद्रे ,सुरेश रंगेनवार ,संदीप केंद्रे यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

 


किनवट : नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने माजी खासदार डी.बी. पाटील यांच्या नांदेड येथील निवासस्थानी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली. या नंतर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची भेट घेऊन करण्यात आलेल्या रणनीती मध्ये किनवट तालुक्यातून सुरेश रंगणेनिवार, नारायण दराडे,भुजंग पाटील,पंडित कदम यांची, तर जिल्ह्यातून भटके-विमुक्त मतदारसंघातून बाबूराव केंद्रे यांची उमेदवारी दाखल करण्याचे ठरविण्यात आले.

    बैठकीस भाजप नेते अनिल तिरमनवार, तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे, जिल्हा परिषद सदस्य सुर्यकांत आरंडकर, भाऊराव राठोड, रमेश बैनवाड ,दिलीप बोंबले ,पंडित व्यवहारे ,तुळशीराम गेडाम, शिवाजी शिरडकर, सचिन पाटील, रामराव जाधव, रामराव राठोड, पंडित पाटील, रमेश राठोड, जयराम राठोड इत्यादींची उपस्थिती होती.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक २०२१ करिता बाबूराव केंद्रे सुरेश रंगणेनिवर संदीप केंद्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांच्याकडे नुकतेच सादर केले.

No comments:

Post a Comment

Pages