किनवट, ता.५ : अतिक्रमणाबाबत शासनाने वेळोवेळी दिलेले निर्णय, न्यायालयाचे
मार्गदर्शन या सर्वांचा विचार करून शहरातील सर्व अतिक्रमणे त्वरित काढण्याची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा शहरात नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जहीर खान, काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अभय महाजन व स्वीकृत सदस्य बाबुराव ओद्दीवार यांनी निवेदनाद्वारे नगर परिषदेचे अध्यक्ष व मुख्याधिकार्यांना नुकताच दिला आहे.
भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीनिवास नेमानीवार यांनी शहरातील सर्व रस्त्यावरील अनाधिकृत बांधकामे ,अतिक्रमणे त्वरित काढण्याबाबत चे निवेदन नुकतेच सर्व संबंधितांना पाठविले होते. या निवेदनाला पाठिंबा दर्शविण्याच्या संबंधाने उपरोक्त तीन नगरसेवकांनी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दिलेला आहे .या प्रकरणी नगर पालिका प्रशासन प्रशासन व जिल्हाधिकारी कार्यालय काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
No comments:
Post a Comment