तीन कृषी कायद्याविरोधात वंचित आघाडी चे धरणे आंदोलन संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 March 2021

तीन कृषी कायद्याविरोधात वंचित आघाडी चे धरणे आंदोलन संपन्न

किनवट, ता.५ : केन्द्र सरकारने शेतकऱ्याविरोधात पारित केलेले तीनही कृषि कायदे त्वरित रद्ध करावेत, या प्रमुख मागणीसह ईतर मागण्यासाठी आज(ता.५) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी केन्द्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करून मागण्याचे निवेदन नायब तहसीलदार शेख एन.एम.यांना  देण्यात आले.

    वंचित बहुजन आघाडीच्यावतीने श्रेद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभरात केन्द्र सरकारने  शेतकऱ्याविरोधात पारित केलेल्या तीन कृषि कायद्याविरोधात एक दिवसीय धरने आंदोलन करण्यात येत असून, या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर वंचितचे नांदेड जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलन कर्त्यानी केन्द्र व राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी केली.जोपर्यंत कृषी कायदे रद्ध होत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार, असा निर्धार वंचितचे तालुकाध्यक्ष किशन राठोड यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हाउपाध्यक्ष  डॉ. संतोष वाठोरे, ओबीसीनेते मारोती चिन्तले, किशनराव ठमके, तालुका महासचिव विलास भालेराव, विठ्ल गडपाळे, मिलिंद धावारे आदींनी आपापल्या भाषणातुन शेतकऱ्यांना उध्व्स्थ करणारे तीनही कृषी कायदे रद्ध करण्याची मागणी केली. मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार शेख एन.एम.यांना देण्यात आले.या धरणे आंदोलनात वंचितचे ज्येष्ठ नेते  जे.टी.पाटील , आनंदराव जळबाजी बेदरे , सुरेश भुजबळ , देवराव सोनकांबळे , विठ्ल गेडाम , संपर्क प्रमुख खरे , अजीज खान पठाण , विकास गोनारकर , मिलिंद वाठोरे,  आदित्य भवरे,  संतोष जाधव, अरविंद जाधव, विजय वाघमारे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Pages