किनवट,ता.२४(प्रतिनिधी)
माहूर किनवट तालुक्यातील वाई बाजार,वानोळा व इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या रुग्णवाहिका आमदार भीमराव केराम यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाकडून उपलब्ध करून देण्यात आले.या रुग्णवाहिकेचे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते समारंभपूर्वक लोकार्पण आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे करून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आले.यावेळी आमदार भीमराव केराम,प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार,उद्योजक तथा भाजपा नेते अनिल सेठ तिरमनवार,सभापती प्रतिनिधी दत्ता आडे, उपसभापती करेवाड,भगवानराव हुरदुके,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संजय मुरमुरे वाई बाजार चे डॉ.श्रीनिवास हुलसुरे,डॉ.पंकज नरवाडे वानोळा,डॉ.के.पी. गायकवाड ईस्लापुर यांच्या सह दादाराव बुरकुले,प्रकाश टारपे व आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रकाश कुडमते,शंकर साबरे,कपिल करेवाड आदी सह आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे कर्मचारी अधिकारी यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवडे यांनी केले.
No comments:
Post a Comment