नांदेड:-कोरोना महामारीच्या अनुषंगाने आपल्यास्तरावरुन संचारबंदी कालावधीत तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.हातावर पोट असणारे व मजूरांचा भुकबळी घेल्यास घेल्यास यास नांदेड जिल्हाधिकारी जबाबदार असतील.संचारबंदी कालवधीत योग्य त्या उपाययोजना न घेल्यास वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर जिल्हा तर्के आंदोलन छेडण्याचा नांदेड जिल्हाधिकारी डाॅ.विपीन ईटनकर व जिल्हापोलिस अधिक्षक नांदेड यांना एका निवेदनाव्दारे वंचित बहुजन आघाडी नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष इंजि.प्रशांत इंगोले यांनी दिला आहे.
दि. 24 मार्च 2021रोजी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलेल्या निवेदनात पुढे असे नमुद केले आहे की,कोरोना महामारीच्या अनुषंगानेच गत वर्षभरापासू जगात,देशात,राज्यात व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपाययोजना होत असल्याचे दर्शविण्यात येत असले तरिही या रोगाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला असून जिल्ह्यात गत वर्षभरापासून सर्वसामान्य जनता व सर्वच घटकांतील लोक हैराण बनलेले आहेत.हातावर पोट असलेल्या मध्यमवर्गीय, कामगार,महिला आदींची आर्थिक घडी विस्कटलेली असून विद्यार्थ्यांना शाळा-काॅलेज बंद मूळे त्यांच्या गुणवत्तेत घसरण निर्माण झालेली आहे.शेतकरी वर्गही नैसर्गिक आपत्ती व कर्जबाजारीपणामुळे अस्वस्थ आहे.
या सर्व बाबींचा विचार करुन त्यावर तात्काळ मार्ग काढून कोरोनाच्या अनुषंगाने कडक उपाययोजनांबाबत प्रयत्न होणे अत्यावश्यक होते.माञ कोरोनाच्या भितीने मानसिक तनावात असलेल्या व आर्थिक संकटात असलेल्या लोकांना मदतीसाठी प्रयत्नांशिवाय यंदाही आपण दि.२४ मार्च च्या मध्यरात्रीनंतर ते दि.४ एप्रिल पर्यंत जिल्ह्यात कडक संचारबंदी जाहिर केलेली आहे.गत संचारबंदी कालावधीचा अनुभव पाहता मध्यमवर्गीय व हातावर पोट असलेले तसेच,रुग्ण व त्यांचे नातेवाईक आदींना त्याचबरोबर,अत्यावश्यक सेवेतील सर्वच विभाग, नोकरदार वर्ग विशेषतः महिला वर्ग यांनाही सेवेच्या ठिकाणी येणे जाणे ञास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महत्वाचे म्हणजे शेतकरीवर्ग, हातावर पोट असलेले मजूरवर्ग,महिला, कामगार, गोर-गरिब आदींचा आर्थिक चणचण व उपासमारीने बळी जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे त्यांना वेळीच मदत व्हावी यासाठी शेतीची कामे करण्यास सुट द्यावी,मजुरांना हाताला काम द्यावे,अत्यावश्यक गरज असल्यास बॅक चालू ठेवावेत, गोरगरीब लोकांना भोजन पुरविण्याची व्यवस्था करावी व सर्व घटकांतील लोकांचे योग्य समुपदेशन करावे.
या सर्व बाबींवर आपण लक्ष देण्यासह कोरोना रुग्णांची तपासणी,उपचार,उपचाराच्या दरम्यान परिस्थिती, औषधोपचार आदी सर्व बाबींवर आपण स्वतः लक्ष द्यावे,
या प्रकरणात आपल्यास्तरावरुन दुर्लक्ष झाल्यास आर्थिक विवंचनेत व उपासमारीने कुणाचा बळी गेल्यास तसेच,एखादा कोरोना रुग्ण वा अन्य आजारातील रुग्ण उपचाराअभावी दगावल्यास वंचित बहुजन आघाडीच्यावतिने तीव्र आंदोलन करण्यात येईल. होणारे परिणामास आपणांसह प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहिल.असा इशारा वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment