खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे कुरुंदयाच्या विश्वनाथ गुमटे यांना ३ लक्ष रुपयाची आर्थिक मदत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 24 March 2021

खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे कुरुंदयाच्या विश्वनाथ गुमटे यांना ३ लक्ष रुपयाची आर्थिक मदत

हिंगोली /नांदेड : यकृताच्या आजाराने त्रस्त असलेल्या  कुरुंदा येथील विश्वनाथ गुमटे  यांना खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने यकृत प्रत्यारोपण करण्याकरिता  ३ लक्ष रुपयाची  आर्थिक मदत प्रधानमंत्री राहत कोष मधून मिळवून  देण्यात  आली आहे . यामुळे गुमटे कुटुंबियांनी खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले असून   त्यांच्यावर पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. 

                   वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील विश्वनाथ गुमटे  हे मागील बऱ्याच दिवसापासून आजारी असलयाने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात दाखल करून तपासण्या  करण्यात आल्यांनंतर डॉक्टरांनी यकृताचा गंभीर आजार झाल्याचे निदान करून सांगितले आणि त्यावर उपाय म्हणून यकृत प्रत्यारोपण करण्याचा एकमेव मार्ग असल्याचे सांगितले आणि त्याकरिता खर्च सुद्धा भरमसाठ येईल असेही म्हणाले परंतु गुमटे  यांची परिस्थिती जेमतेम असून रुग्णालयाचा खर्च झेपणारा नसल्याने त्यांनी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे मदतीकरिता संपर्क केला असता त्यांना खासदार हेमंत पाटील यांच्या आरोग्य यंत्रणेकडून सर्व माहिती देण्यात येऊन प्रधानमंत्री राहत कोषातून आर्थिक मदत करता येऊ शकते असे सांगण्यात आले परंतू  याकरिता कालावधी सुद्धा लागू शकतो असे असताना त्यांना तात्काळ मदत मिळवून देण्याचे आदेश खासदार हेमंत पाटील यांनी दिल्यानंतर कार्यालयातून त्यांच्याकडून पूर्ण कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली आणि अवघ्या ४५ दिवसात पूर्ण प्रक्रिया करून गुमटे  यांना पुढील उपचाराकरिता ३ लक्ष रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्यात आली त्यांच्यावर पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात  उपचार सुरु असून यकृत प्रत्यारोपण करण्याची प्रक्रिया लागणार आहे याकरिता आणखी आर्थिक मदत लागणार आहे . परंतु खासदार हेमंत पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे आमच्या रुग्णाला तात्काळ मदत मिळाली आहे अशी भावना गुमटे  कुटुंबियांच्या वतीने व्यक्त करून आभार मानले आहेत . खासदार हेमंत पाटील यांच्यामुळे मतदारसंघ आणि मतदारसंघाबाहेरील अनेक  गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यात आली आहे त्यामुळे आजवर अनेक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages