विद्यार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन च्या शिष्टमंडळाने घेतली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 March 2021

विद्यार्थ्यांच्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी नॅशनल स्टुडंट्स युनियन च्या शिष्टमंडळाने घेतली उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट

 


मुंबई:

जागतिक महामारी कोरोना (कोविड-१९)च्या पार्श्वभूमीवर अनेक शैक्षणिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे .त्यापैकी काही महत्वाच्या अडचणी आणि त्यावरील उपाय नॅशनल स्टुडंट्स युनियन च्या शिष्टमंडळाने सुचवले आहेत त्यातील प्रमुख मागण्या .

१. वैश्विक कोरोना महामारी आणि लॉक डाउन मुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,पालकांचे कामधंदे बंद झाले आशा परिस्थिती विद्यार्थ्यांवर सुद्धा आर्थिक भार पडत आहे त्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावात आहेत .आशा वेळी आपण शैक्षणिक शुल्क कपात करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा .ज्यामध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा, जिमखाना तसेच वसतिगृह शुल्क कपात करावी किंवा सरसकट 50% फी माफी करावी .

२. शैक्षणिक वर्ष लांबत असल्याने देशातील तसेच निकाल वेळेवर लागत नसल्याने परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या आणि  विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश न मिळाल्याने एक वर्ष वाया जात आहे या धर्तीवर शैक्षणिक वर्ष लांबविण्या पेक्षा ते मूळ जसे आहे तसेच (जून ते जून) ठेवावे .

३. विधी अभ्यासक्रम LLB (3वर्षे) प्रवेशासाठी होणारा विलंब आणि त्यामुळं होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ती जलद गतीने पूर्ण करावी त्याचबरोबर खुल्या प्रवर्गात प्रवेश घेणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून फी वसुली करणाऱ्या महाविद्यालयावर कठोर कार्यवाही करावी.

४.कोरोना महामारीत विद्यार्थ्यांना शिक्षण ऑनलाईन पद्धतीने झाले ज्यामध्ये कित्येक विद्यार्थी दर्जेदार शिक्षणा पासून वंचित राहिले अनेक अडचणींना सामोरे जावे लागले अशांना महाविद्यालयात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध करावी .

५.महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ अधिनियम-२०१४ ची अंमलबजावणी करावी तसेच BATU च्या धर्तीवर विधी विद्यापीठ स्थापन करून संपूर्ण राज्यातील विधी महाविद्यालय एकाच विद्यापीठ शी संलग्न करून अभयसक्रमात एकसूत्रता अनावी.

६.विद्यार्थ्यांना अभ्यास साहित्य व कायदेविषयक पुस्तके कमी दरात मिळण्यासाठी शासकीय मुद्रण संस्था मार्फत मुबलक छपाई वीतरण करावे .

७.विद्यपीठ अनुदान आयोग च्या मार्गदर्शक सूचना मुद्दा क्र.3.2 (Measure Required for reopening Education institution) यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष येण्याची तयारी नसेल तर त्यांच्यासाठी ऑनलाईन शिक्षण तसेच परीक्षा घेणे संदर्भात ची पूर्ण व्यवस्था विद्यापीठांनी करावी .त्यांना आवश्यक अभ्यास साहित्य ,ई-स्त्रोत (E-Resource) उपलब्ध करून द्यावे,तसेच वैद्यकीय मूल्यांकन(clinically assessed),स्क्रीनिंग,आयसोलेशन आणि क्वारंटाईन सुविधा ,स्वछता आणि हायजीन उपलब्ध करून द्यावी .

८.विद्यपीठ अनुदान आयोग च्या मार्गदर्शक सूचना मुद्दा क्र 5.2 -(Role of Stakeholders & Head of institution)

त्यामध्ये असं म्हटलं आहे  की विद्यापीठ/शैक्षणिक संस्था कडे SOP-Standard Operating Procedure तसेच संस्थात्मक नियोजन असणे आवश्यक आहे .ज्यामध्ये हॉस्पिटल सोबत टाय अप असणे आवश्यक आहे .तर तुम्ही आशा किती संस्थाचा टाय अप आहे याचा अहवाल आम्हास सादर करावा .

९.या अनुषंगाने विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये चा विमा देण्याची तरतूद करावी .

१०.अपल्यासोबत ५ मार्च रोजी भेटीत दिलेल्या निवेदनानुसार CDAC संदर्भात SIT गठीत करून कसून चौकशी करावी आणी दोषींवर कार्यवाही करावी .


अशा मागण्यांचे निवेदन नॅशनल स्टुडंट्स युनियन चे संस्थापक अध्यक्ष दादाराव नांगरे,मुख्य सल्लागार सुनील शिरीषकर,समाजकार्य सल्लागार सुनील यादव ,मुंबई विभाग अध्यक्ष सुनील सुरंजे व सांगली जिल्हा अध्यक्ष आकाश बोले यांनी मंत्रीमहोदय यांची भेट घेऊन सादर करण्यात आले .

या निवेदनात दिलेल्या 9 मागण्या मान्य करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल अशे उदय सामंत यांनी संघटनेला आश्वस्त केले
No comments:

Post a Comment

Pages