भारतीय महिलांचा जागतिक महिला दिन केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 10 March 2021

भारतीय महिलांचा जागतिक महिला दिन केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच

 


 नागपूर,  : दि.बुद्धा चॅरिटी क्लिनिक चा पहिला वर्धापन दिन तथा जागतिक महिला दिना निमित्त अत्यंत महत्वपुर्ण चर्चा सत्राचे आयोजन करन्यात आले ज्यामध्ये  डॉ. शिल्पाताई पाझारे, (MS DNB GEN.SURG) यांनी विचार व्यक्त करताना स्त्रियांचे शारिरीक आजार तथा घ्यावयाची काळजी तसेच ब्रेस्ट कॅन्सर लक्षने आणि उपाय यावर सखोल मार्गदर्शन केले.

    डॉ. प्रेरणाताई कांबळे(MBBS MD pathology)  ह्यांनी मुख गर्भाशय वरील कॅन्सर 

कोणत्या वायरस होतो त्याची लक्षणे आणि घ्यावयाची काळजी ह्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण सखोल मार्गदर्शन केले.तसेच

  ऍड. स्मिताताई कांबळे (अधिवक्ता उच्च न्यायालय,SSD)  ह्यांनी आंबेडकरी चळवळी मध्ये महिलांचे महत्त्व व योगदान ह्या विषयावर परखडपने विचार व्यक्त केले. तथा प्रत्येक कालखंडा मध्ये स्त्रियांची स्थिती विषद करुन संविधानिक स्त्री आज स्वतंत्र मुक्त पने प्रगती करतेय ते फक्त बाबासाहेब आणि फुले दाम्पत्य मुळेच , सोबत च महिलांचे कायदे विषयक हक्क अधिकार सांविधानिक प्रावधान ह्या वरहि सखोल अभ्यासपूर्ण मांडणी ताई नी विषद केली. आनी बुद्धा क्लीनीक चा गोर गरीब जनतेला होत असलेला लाभ तथा एक वर्षामधील वाटचाल ह्याची सविस्तर माहिती देन्यात आली.

   रूबल साळवे, कलश, आणि विशाखा साळवे ह्यांनी महिलांना self defence चे प्रात्यक्षिक करून दाखविले. सैनिक भगिनी ज्योति चंद्रशेखर, पद्मा भिवगड़े ह्यानी देखील कविता स्वरू पात विचार व्यक्त केले.

सूत्र संचालन  दिशु कांबळे  तर आभार सैनिक  रुबल साळवे हिने मानले.

  चर्चासत्र यशस्वीतेसाठी - सैनिक  बबीता खोब्रागड़े, सुरेखा शंभरकर,शामली मेश्राम, रजनी रंगारी, वंदना बागडे, चकार पाटील, स्नेहा खोब्रगडे,राजश्री ढवळे, दर्शना लाडे, कौसल्याताई ,शिल्पा सहारे, दिक्षिता , स्मिता नारनवरे, राजश्री ताई तथा समस्त मुख्यालय महिला विंग, आनंद नगर, पंचशील नगर, संबोधी विहार शाखा महिला विंग आदिनी परिश्रम घेतले.अत्यंत महत्वपूर्ण चर्चासत्र सर्व नियमांचे पालन करुन अधिक संख्या वर्ज करुन केवळ ४५ महिलांच्या उपस्थिति मधे हा छोटेखानी कार्यक्रम पार पाड़न्यात आलाय.

No comments:

Post a Comment

Pages