मुंबई दि.11 - महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण मिळते तसेच राजकीय आरक्षण विधान सभा आणि लोकसभेत महिलांना मिळायला हवे.केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी महिलांना विधानसभा आणि लोकसभेत 33 टक्के आरक्षण देण्याचा संसदेत कायदा करण्याची मागणी केली आहे ती मागणी योग्य असून आरक्षणाच्या हक्कासाठी महिलांनी संघटित होऊन लढा उभारावा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी च्या राष्ट्रीय मार्गदर्शक सौ सीमाताई रामदास आठवले यांनी केले.बांद्रा पूर्व येथे रिपाइं महिला आघाडी च्या तालुका अध्यक्षा अस्मिता अहिरे यांनी जागतिक महिला दिना निमित्त आयोजित केलेल्या महिला स्नेह संमेलनात सौ सीमाताई आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.यावेळी रिपाइं महिला आघाडी जिल्हा अध्यक्षा स्वप्नाली जाधव ; छाया सावंत; ललिता पोळ; अश्विनी तांबे; चित्रा तांबे; अनिता तांबे आदी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment