डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती एकदरा येथे उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 27 April 2021

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती एकदरा येथे उत्साहात साजरी

नांदेड : नांदेड येथून जवळच असलेल्या एकदरा गावात भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करून साजरी करण्यात आली. एकदरा येथील बौद्ध विहार परीसरात कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली

  यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून मा. निलेश गोधने व नागेश हिंगोले हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून  ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे,व शुध्दोधन बुक्तरे हे होते

     गोधणे,पुढे बोलताना म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्याही एका समाजासाठी कार्य केलेले नाही सर्व भारतीयांसाठी कार्य केले आहे. बाबासाहेबाना एका जातीत बांधू नका ते जगाच्या पाठीवर ज्ञानाचे प्रतीक म्हणून त्यांची ओळख आहे.

  तसेच  या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष राजरत्न हिंगोले उपाध्यक्ष, राजू दुधमल, सचिव सुदर्शन, हिंगोले ,सल्लागार सतीश हिंगोले, मार्गदर्शक कपिल हिंगोले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपासक स्वप्नील हिंगोले  यांनी केले व आभार सतीश हिंगोले (ग्रा.पं.सदस्य) यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी उपस्थित नवयुवक भीम जयंती मंडळ राहुल हिंगोले, प्रदीप हिंगोले ,प्रीतम हिंगोले, नितीन हिंगोले,विनोद हिंगोले,संतोष दुधमल,बलविर चव्हाण, अंकुश बहात्रे ,पंकज हिंगोले ,अजय हिंगोले, संदीप हिंगोले ,ऋषिकेश हिंगोले,कैलास बहात्रे, भास्कर हिंगोले ,पंजाब हिंगोले ,अजिंक्य दुधमल,रुख्मानंद हिंगोले, सुरज दुधमल ,चंद्रकांत बहात्रे व आदीने परिश्रम घेतले उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिकरित्या त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Pages