समता प्रतिष्ठान नागपुरची रिक्त पदे तत्काळ भरणेबाबत विविध संघटनांचे संयुक्तिक निवेदन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 5 April 2021

समता प्रतिष्ठान नागपुरची रिक्त पदे तत्काळ भरणेबाबत विविध संघटनांचे संयुक्तिक निवेदन


नागपुर :

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठनाची स्थापना करण्यात आलेली होती. सदर प्रतिष्ठणामार्फत विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्यात येत होते. उपक्रम राबविताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीवरून प्रतिष्ठनाची चौकशी करण्यात आली आणि चौकशी दरम्यान प्रतिष्ठांनातील अधिकारी/कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले. तद्नंतर मागील बर्यााच दिवसांपासून समता प्रतिष्ठनाद्वारे कोणत्याही प्रकारचे सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आलेले नाही- समता प्रतिष्ठनाद्वारे राबविण्यात येणार्याी कार्यक्रमांना अधिकारी/कर्मचारी नसल्याकारणे खंड पडलेला आहे. त्यामुळे संस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रमापासून समाज वंचित झालेला आहे. झालेल्या आर्थिक गाईर्व्यवाहारामुळे प्रतिष्ठान बंद करणे योगी नाही याची दखल शासन प्रशासनाने जातीने घेवून समता प्रतिष्ठानातील संपूर्ण पदे तत्काळ भरण्यासंदर्भात विविध संघटनेदवारे मा. धनंजय मुंढे, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांना मा. उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपुर यांचेद्वारे निवेदन देण्यात आले. निवेदन देताना प्रामुख्याने रिपब्लिकन आघाडीचे संजय पाटील, सचिन गजभीये, मानव अधिकार संरक्षण मंचचे आशीष फुलझेले, द प्लॅटफॉर्मचे राजीव खोब्रागडे, डों. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे भूषण वाघमारे, आशीष तितरे, प्रकाश वाघमारे आदि उपस्थित होते.No comments:

Post a Comment

Pages