डॉक्टर आंबेडकर जयंती घरीच साजरी करा : सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांचे शांतता बैठकीत आव्हान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 8 April 2021

डॉक्टर आंबेडकर जयंती घरीच साजरी करा : सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांचे शांतता बैठकीत आव्हान

किनवट ,ता.८ : कोरोना या वैश्विक महामारी च्या पार्श्वभूमीवर कोरोना नियमावलीचे पालन करूनच गतवर्षी प्रमाणेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, गुढीपाडवा, रमजान ईद मास व इतर येणारे सण साधेपणाने घरीच साजरे करा, असे आव्हान सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी केले.

   गुरुवारी (ता.८)उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शांतता समितीची बैठक सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते. बैठकीचे प्रास्ताविक तहसीलदार उत्तम कागणे यांनी केले.

यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार नाईक यांनी मार्गदर्शन केले. बैठकीत अर्षद खान, एड. सम्राट सरपे, अभियंता प्रशांत ठमके, माजी नगराध्यक्ष साजिद खान, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, वैजनाथ करपुडे पाटील, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,  समता नगर जयंती मंडळाचे अभय नगराळे, माजी नगराध्यक्ष ईसा खान व भारतीय जनता पक्षाचे शिवराज राघू मामा यांनी मनोगत व्यक्त केले.

  यावेळी बोलताना सिद्धार्थनगर जयंती मंडळाचे उपाध्यक्ष एड.सम्राट सरपे  म्हणाले की, "फुले - आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात करिता ५० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी. 

   बैठकीस पोलीस निरीक्षक मारुती थोरात, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री. सुनकेवार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.  संजय मुरमुरे, अन्य अधिकारी ,अभि.सचिन गिमेकर, सम्यक सर्पे , निखिल कावळे, निखिल कार्ले यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages