नागपुर : गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अनेकांना क्वारंटाईन (विलगीकरण) व्हावे लागत आहे. उत्तर नागपुरातील गरीब व मध्यमवर्गीयांना घरात विलगीकरणात राहणे शक्य होत नाही. यावर उपाय शोधण्यासाठी इतरांना कोरोनाची लागण होऊ नये, या उद्देशाने क्वारंटाईन सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. त्याअनुषंगाने उत्तर नागपुरातील गरीबांसाठी संकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून कपिल वस्तू बुद्धविहार पंच कमिटी व नागपूर शाहीनबाग कमिटीच्या संयुक्त विद्यमानाने कपिल नगर बुद्ध विहार आणि इस्लामीक कलचर सेंटर, अशी नगर येथे दोन क्वारंटाईन सेंटर सुरू झाले आहेत.
जवळपास दीडशे (150) रुग्ण या दोन क्वारंटाईन सेंटरमध्ये राहू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी डॉक्टर, नर्स व पॅरामेडीकल कर्मचारी सेंटर मध्ये उपस्थित राहणार आहेत. सामाजिक बांधिलकीतून हे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. अनेकांना गृह विलगीकरणात राहावे लागते. परंतु घरे छोटे असल्यामुळे वेगळे राहणे रुग्णांना शक्य होत नाही. यामुळे घरातील इतरांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका राहतो. यापासून घरातील इतरांना सुरक्षित ठेवण्यासाठी क्वारंटाईन सेंटर सुरू करण्याचा निर्धार संकल्प सामाजिक संस्थेने केला आहे.
या क्वारंटाईन सेंटरमध्ये गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना ठेवले जाणार नाही. त्यांची तपासणी केल्यानंतर केवळ विलगीकरणात राहू शकणाऱ्या कोरोनाग्रस्तांना या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाईल. तसेच, क्वारंटाईन सेंटरमध्ये मोफत जेवणाची व औषधीची व्यवस्थाही केली आहे.
No comments:
Post a Comment