ओ.बी.सी.व महिलांच्या हक्क अधिकारासाठी केंद्रीय कॕबिनेट मंञी पदाचा राजीनामा देणारे महान मानवतावादी , समतावादी महामानव विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर होते. त्यांनी जात,धर्म ,पंथ,प्रांत ,भाषा,स्ञी-पुरुष ,गरीब-श्रीमंत,शिक्षित-अशिक्षित अशा कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता माणसाला माणूस म्हणून हक्क ,अधिकार भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिले.
प्रस्थापित मनुवादी व्यवस्थेने डाॕ. बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे कैवारी, उद्दारकर्ते म्हणून आमच्या समोर सादर केले आणि ते आम्ही स्वीकारले . अप्रत्यक्षरित्या आपण सर्वांनी मनुवादी व्यवस्थेचेच काम केले.
आम्ही स्वतःस ओ.बी.सी.म्हणून घेणाऱ्यानी भारतीय संविधानात 340 कलम ओ.बी.सी., 341कलम एस.सी. , 342 कलम एस.टी. साठी तरतूद केली. हे बघितल्यास एस.सी.,एस.टी. च्या आगोदर आरक्षण हे ओ.बी.सी. बांधवास दिले .याचा अर्थ डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे ओ.बी.सी.चे उद्दारकर्ते आहेत. तत्कालीन प्रधानमंञी पंडीत जवाहरलाल नेहरू हे ओ.बी.सी.साठी आयोग नेमत नव्होते . त्यांच्या समस्या जाणून सामाजिक , शैक्षणिक , सांस्कृतिक ,आर्थिक मागसलेपण दूर करण्यासाठी शिफारशी करत नव्होते .तेव्हा बाबासाहेबांनी ही मागणी लावून धरली.तरीही पंडीत जवाहरलाल नेहरू ऐकत नव्होते म्हणून त्यांनी आपल्या मंञी पदाचा राजीनामा दिला.
भारतीय महिलांना मनुस्मृती सहिते प्रमाणे भोगाची वस्तू मानले जायचे. प्रस्थापित व्यवस्थेने त्यांचे माणूसपण नाकारुण अस्तित्वहीन परावलंबी बनविले होते. अशा परिस्थितीत हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून वडीलांच्या,पतीच्या संपत्तीत वाटा मिळणार होता, पती घटस्फोट घेत असल्यास पोटगीचा अधिकार मिळवून देवून न्याय ,हक्क देण्याचा प्रयत्न केला. पण मनुवाद्दांना स्ञीयांना कायम गुलाम ठेवायचे असल्याने हिंदू कोड बील पारीत होऊ दिले नाही. म्हणून बाबासाहेबांनी आपल्या मंञी पदाचा राजीनामा दिला.
कामगारांच्या हक्क अधिकारासाठी त्यांनी तरतुद केली. त्यामध्ये कामाचे दिवस, तास , वीमा संरक्षण ,वेतन यासोबतच महिलांसाठी समान काम समान वेतन ,प्रसुती काळात प्रसुती अगोदर व नंतर पगारी रजा आदिची तरतुद केल्याने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे महिलांचे उद्दारकर्ते आहेत .आजच्या स्ञीयांना आपल्याला गुलामीत कोणी ठेवले व हक्क अधिकार देवून गुलामीतून बाहेर कोणी काढले हेच माहीत नाही हीच खरी शोकांतिका आहे.
प्रस्थापित व्यवस्थेने षडयंञ रचले आणि बाबासाहेबांना दलितांचे उद्दारकर्ते करून टाकले . त्यात आपण ही भर टाकली. बाबासाहेब जेव्हा दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले तेव्हा कृष्णाजी अर्जुन केळुस्कर गुरूजीनी स्वतः लिहिलेले तथागत गौतम बुद्धाचे चरिञ देऊन अभिनंदन केले. पुढील शिक्षणासाठी बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळवून दिली. राजर्षी शाहू महाराजांनी विदेशात शिक्षणासाठी मदत केली. ही सर्व समावेशक विचारधारा आपण समजून घेतली पाहीजे. महामानव डाॕ.बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सहा विद्वाना पैकी एक होते. त्यांनी आपली सर्व बुद्धिमत्ता ,आपले कर्तृत्व भारतीयांच्या कल्याणासाठी वापरले .त्यांनी जर तेव्हा मनात आणले असते तर डोंगरा ऐवढा पैसा मिळवला असता आणि आज आंबेडकर कुटुंब भारतातच नव्हे तर जगात श्रीमंत राहीले असते. त्यांचा उद्देश पैसे मिळवणे हा नव्होता तर संत तुकाराम महाराजांच्या "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तेचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा ",या उक्ती प्रमाणे शोषित, पीडित,वंचित लोंकाच्या जीवनात हक्क ,अधिकार ,त्यांचे कल्याणरुपी सुर्य प्रकाश आणायचा होता .स्वातंत्र्य ,समता,बंधुता आणि सामाजिक न्यायावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करायची होती. हे भारतीयांनी समजून आत्मसात केल्यास देशाचे चिञ बदलण्यास वेळ लागणार नाही .
आज या महामानवांना जाती आणि धर्माचे अनुयायी नको तर त्यांच्या विचार आणि कार्याचे अनुयायी हवे आहेत. इतिहासकार प्रा.मा.म.देशमुख सर म्हणतात," महापुरुषांचे पुतळे ,स्मारके जरूर उभारा पण त्यांचा देव करू नका ." आपण त्यांचा देव तर करत नाही ना ? त्यांचे नाव घेत चुकीचे काम करून इतरांच्या मनात तिरस्काराची भावना तर निर्माण करत नाही ना ? यावर विचार ,चिंतन करण्याची गरज आहे असे मला वाटते. आता बाबासाहेब होणे नाही पण त्यांना अभिप्रेत असलेला माणूस माञ नक्की होऊ शकतो .तेव्हाच खऱ्या अर्थाने जयंती दिनी अभिवादन ठरेल.
जय जिजाऊ ..जय भीम..
दगडू भरकड
मराठा सेवा संघ ,किनवट
No comments:
Post a Comment