औरंगाबाद शहरात भीमजयंती चा जल्लोष विविध लोकोपयोगी उपक्रमातून साजरी केली भीमजयंती - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 April 2021

औरंगाबाद शहरात भीमजयंती चा जल्लोष विविध लोकोपयोगी उपक्रमातून साजरी केली भीमजयंती


औरंगाबाद :

जगभर कोरोनाच्या भीतीमुळे विविध सण उत्सवाला प्रतिबंध लावला असतांना आंबेडकरी अनुयायांनी विविध सामाजिक व लोकोपयोगी उपक्रमातून जल्लोषात भीमजयंती साजरी करत उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.

त्यामुळे भीतीच्या सावटाखाली असलेल्या वसाहती भीमजयंती मुळे उजळून निघाल्या आहेत.


शहरातील संजयनगर मुकुंदवाडी,आंबेडकर नगर,रमानगर ,उस्मानपूरा,कबीर नगर,इटखेडा,क्रांतीनगर,किल्लेआर्क,लक्ष्मी कॉलनी,कोतवालपुरा,भीमनगर,भावसिंगपुरा, बौद्धवाडा पैठणगेट, समतानगर,शंभुनगर,काबरा नगर,कांचनवाडी,हमालवाडा, राहुलनगर,जयभीम नगर टाऊन हॉल,बालाजी नगर यांच्या सह जवळपास सर्वच वसाहतीत आकर्षक पद्धतीने विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन


कोरोनामुळे आरोग्यसेवेवर मोठा ताण आलेला असतांना रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे ही बाब लक्षात घेऊन आंबेडकरी अनुयायांनी तसेच विविध पक्ष संघटनांनी रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे त्यात भडकल गेट येथे भीमसैनिकांनी महा रक्तदान शिबार,सुरेश वर्मा मित्रमंडळ वतीने अजिंठा हॉल,छावणी येथे,भीमशक्ती व काँग्रेस,अनुसूचित जाती विभाग च्या वतीने पैठणगेट येथे अरुण शिरसाठ,संतोष भिंगारे यांनी,अहिल्याबाई होळकर चौक कोकनवाडी येथे वंचित बहुजन आघाडीचे मनोज वाहुळ यांनी,वंचितचे पंकज बनसोडे यांनी गोपाल टी कॉर्नर येथे,संजयनगर मुकुंदवाडी येथे सतीश गायकवाड यांच्यासह विविध ठिकाणी रक्तदाते रक्तदान करून अभिवादन करणार आहेत.


हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी


भडकलगेट,क्रांतिचौक,औरंगपुरा,कोकनवाडी चौक,मिल कॉर्नर येथील महापुरुषांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे तसेच कोरोनाच्या महामारीसोबत लढा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर घाटी रुग्णालय,मिनी घाटी रुग्णालय,चिकलठाणा,पोलीस कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी यांच्यावर देखील राजू शिंदे,विनोद पाटील,जयप्रकाश नारनवरे,कुणाल राऊत,सचिन बोर्डे,कमलेश चांदणे,संघर्ष सोनवणे पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे.


भडकलगेट येथे अभिवादनासाठी आंबेडकर अनुयायांची लगबग


अनेक ठिकाणी निळे धमचकरांकित ध्वज विक्री केंद्र


जयभीमनगर टाऊन हॉल येथे बाबासाहेबांच्या विचारांचे सुमारे 25 मोठे फलक कुणाचेही छायाचित्र न  लावता लावण्यात आले आहे जेतवन बुद्ध विहार,मिलिंद ग्रुप ने ह्या साठी परिश्रम घेतले आहे.


नागसेनवनातील सर्व महाविद्यालयावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.


शहरभर जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक लावण्यात आले आहे.


विद्यापीठात सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने वतीने अजय देहाडे,चरण जाधव,कुणाल गायकवाड,सचिन भुईगळ आदी कलावंतांची भीमगीतांची मैफिल घेण्यात आली व तू समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आली विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने फेसबूक व थेट प्रसारित केली ह्या साठी दिक्षा पवार,लोकेश कांबळे,जयश्री शिरके, अक्षता दाभाडे ह्यांनी ह्यासाठी परिश्रम घेतले


रिपब्लिकन सेनेचे मिलिंद बनसोडे यांनी देखील त्यांच्या फेसबुक पेज वरून 7 दिवस विविध वक्त्यांचे व्याख्यान आयोजित केले होते त्यात डॉ.वाल्मिक सरवदे,डॉ.संजय मुन,पत्रकार डॉ.शेखर मगर,प्राचार्य सुनील वाकेकर,सुदाम चिंचाने आदींनी भूमिका विषद केली दि.१४ एप्रिल रोजी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर हे अध्यक्षीय समारोप करतील 


भीमजयंती डॉट कॉम ह्या वेबसाईट वरून देखील विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम ऑनलाईन स्वरूपात आयोजित केले आहे.


बादशाह ग्रुपच्या वतीने मिलकॉर्नर येथील ध्वज स्तंभाचे सुशोभीकरण करण्यात आले


 नागसेनवनातील लुम्बिनी उद्यान येथे सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह परिसरात

 पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने सकाळी 8:30 ते 4 वाजेपर्यंत स्वच्छता करण्यात आली.

यावेळी जेष्ठ नागरिक व नागसेनवतील भूमीवर जीवापाड प्रेम करणारे रज्जाक मामु यांनी भेट देऊन सर्वांचा उत्साह वाढवला.

No comments:

Post a Comment

Pages