कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाटले 3 हजार मास्क व मुक्ती कोण पथे ? ग्रंथाच्या प्रतीचे वाटप आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने जनजागृती करून अनोखे अभिवादन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 14 April 2021

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाटले 3 हजार मास्क व मुक्ती कोण पथे ? ग्रंथाच्या प्रतीचे वाटप आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने जनजागृती करून अनोखे अभिवादन

औरंगाबाद- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी न करता सामाजिक उपक्रम राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मिलिंद- नागसेनवन स्टुडंन्ट्स वेलफेअर असोसिएशन व रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या वतीने  तीन हजार मास्क,  मुक्ती कोण पथे? या ग्रंथाच्या पाचशे प्रति वाटून सामाजिक उपक्रम राबविला.

सदरील मास्क चे विमोचन पोलीस उपायुक्त श्री. निकेश खाटमोडे यांच्या परिमंडळ-१ पैठणगेट येथील कार्यालयात आज करण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर स्वतःची काळजी घेऊन वारंवार हात धुणे, मास्क परिधान करणे, सोशल डिस्टनसिंग ठेवणे अशी काळजी प्रत्येकाने घेणे अपेक्षित आहे. लोकांमध्ये मास्क घालण्यासाठी जनजागृती व्हावी या हेतूने पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी  मास्क वाटप तसेच मुक्ती कोण पथे? या ग्रंथाच्या प्रति वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अनोखे अभिवादन केले. तयार करण्यात आलेल्या मास्कवर ' वुई आर इंडियन्स फर्स्टली अँड लास्टली' हा बाबासाहेबांचा संदेश मास्क वर मुद्रित करण्यात आला आहे. याशिवाय कोरोनाचे नियम पाळूयात, कोरोनाला रोखुया' हा संदेश त्यावर टाकण्यात आला आहे. श्रावण गायकवाड ,सचिन निकम,अविनाश डोंगरे,गुणरत्न सोनवणे, अतुल कांबळे, सचिन भुईगळ,प्रा.प्रबोधन बनसोडे, स्वप्नील गायकवाड, शेखर म्हस्के,भीमशाहिर मेघानंद जाधव,डॉ.किशोर सूर्यवंशी,विकास रोडे,शाहीर चरण जाधव,हेमंत मोरे,तुषार अवचार,दिलीप तडवी,सनी देहाडे,किरण शेजवळ,रोहित लखमल,चेतन गाडे,इंजि अविनाश कांबळे,इंजि प्रसेनजीत गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

No comments:

Post a Comment

Pages