यश मल्टिसर्व्हिसेस व्हाट्सअप्प ग्रुप आयोजित ऑनलाईन महामानवांची जयंती सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 14 April 2021

यश मल्टिसर्व्हिसेस व्हाट्सअप्प ग्रुप आयोजित ऑनलाईन महामानवांची जयंती सोहळा

 


(देगलूर)

जगभर कोरोनाच्या भीतीमुळे विविध सण उत्सवाला प्रतिबंध लावला असतांना यश मल्टिसर्व्हिसेस व्हाट्सअप्प ग्रुप च्या माध्यमातून  क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 194 वी व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी संयुक्त  ऑनलाइन जयंती महोत्सव साजरा करून विचारांची देणावघेवान करत साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.बालाजी मुंके सर यांनी तर प्रमुख वक्ते म्हणूनप्रा.प्रदीप एडके बोधडी,मा.रणजित भुसावळे,मा.किशोर काळे,मा.राजेश वाघमारे,मा.आशिष बोयनर,मा.विजय कांबळे व कु .श्वेता तुकडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या प्रसंगी मा.प्रदीप एडके यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मागील पिता रामजी बाबा आंबेडकर,माता रमाई याचे महत्व विशद करून डॉ आंबेडकरांचे विचार आणि तत्व अंगीकारण्याचे आव्हान आपल्या मार्गदर्शनातून केले.

मा.आशिष बोयनर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले तर उर्वरित सर्व वक्ते गण यांनी देखील अतिशय सखोल असे मार्गदर्शन केले

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.वैभव भंडारे ,सूत्रसंचालन मा.सचिन गिमेकर तर आभार मा.राजेश वाघमारे यांनी केले

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष तांत्रिक सहकार्य म्हणून

अविनाश पाटोळे,सचिन गिमेकर,अविनाश गायकवाड,अमित बागल,यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Pages