अंबाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 15 April 2021

अंबाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे अनावरण

 किनवट (प्रतिनिधी):किनवट तालुक्यातील अंबाडी येथे भव्य उभारण्यात आलेल्या भारतरत्न, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण भारतीय बौध्द महासभा अंबाडीचे अध्यक्ष आदरणीय उपा. सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते व स्मारक समितीचे अध्यक्ष उपा. दिनेश लढे,उपाध्यक्ष सुभाष कयापाक,सचिव संजय तामगाडगे ,पत्रकार गोकुळ भवरे,आंबेडकरी नेते किशनराव ठमके, शेषराव लढे,वंचितचे तालुकाध्यक्ष किशनराव राठोड,भारतीय बौध्द महासभेचे सचिव मिलिंद मूनेश्वर, आनंदराव तेलंगे, रत्नकार मुनेश्वर,भीम जयंती उत्सव समितीचे सचिव प्रेमानंद कानींदे,पत्रकार संतोष सिसले,दीपक तामगाडगे,व श्रावण घुले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१४ एप्रिल २०२१ रोजी मोठ्या थाटामाटात व उत्साहात संपन्न झाला. उपस्थित बौद्ध उपासक-उपसिका यांना आयु.प्रेमानंद कानींदे व उमेश भवरे यांनी त्रीशरण आणि पंचशील ग्रहण केले.अनावरण सोहळ्यानंतर किनवट विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय भीमराव केराम साहेब यांनी भेट देऊन उभारण्यात आलेल्या भव्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्या समवेत किनवट नगरीचे नगराध्यक्ष आनंदजी मच्येवार,पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे,सामाजिक कार्यकर्ते मारोतराव भरकड,विजय पोलासवार संतोष मिरासे मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.आमदार भीमराव केराम यांचे भारतीय बौध्द महासभा व स्मारक समितीच्या वतीने शाल व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन दिले असता आमदार निधीतून तत्काळ सांची विहाराचे सुशोभीकरण करण्याकरिता १५ लाख रुपयाचे निधी मंजूर केला व अंबाडी ते शिवरामखेडा रस्ता कामासाठी १५ लाख रुपयांची निधीही मंजूर केल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास तामगाडगे प्रास्ताविक सुभाष कयापाक यांनी केले तर आभार प्रदर्शन दिनेश लढे यांनी मानले.अनावरण सोहळ्यात उपासक-उपसिकांनी सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते

No comments:

Post a Comment

Pages