आत्मविश्वास व डॉक्टरांच्या प्रयत्नातून 62 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday, 5 May 2021

आत्मविश्वास व डॉक्टरांच्या प्रयत्नातून 62 वर्षाचा वयोवृध्द कोरोनातून बाहेर


किनवट  : येथील सुमारे 62 वर्षाचे महादेव मंत्री हे भौतिक सुविधा व आजच्या जगात हाती असलेल्या मोबाईल पासून कोसोदूर.  उगवत्या सुर्याला नमस्कार घालायचा आणि आपापल्या कामात स्वत:ला दिवसभर झोकून द्यायचे असा यांचा शिरस्ता.पंधरा दिवसापूर्वी  त्यांना त्रास व्हायला लागला.तपासण्या झाल्या. सिटीस्कॅनचा स्कोअर वाढुनच असल्याने त्यांना किनवट गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटर मध्ये दाखल केले.वय आणि सिटीस्कॅनचा स्कोअर हे सारेच अधिक असल्याने उपचार करणारे डॉक्टर सुरवातीला चिंतेत होते.

 

एक आव्हान म्हणून रुग्णालयातील टिमने त्यांच्यावर उपचार सुरु केले. एरव्ही श्वास घ्यायला जिथे बाबांना त्रास होत होता तो हळूहळू काही दिवसांत फुलायला लागला. कोविड रुग्णालयातील त्यांच्या आजूबाजूचे सारे रुग्ण त्यांना पाहून त्यांच्या निर्धाराला पाहून अचंबीत झाले, तेवढेच हे बाबा निर्धास्त होते. मोबाईलपासून कोसोदूर, बाह्य जगात काय चालू आहे यांच्या फारश्या भानगडीत न पडता डॉक्टर जे काही सांगतात ते श्रध्दा ठेवनू ऐकायचे आणि कोणतेही प्रश्न न विचारता दिलेल्या गोळया घ्यायच्या या बाबाच्या स्वभावामूळे उपचार करणाऱ्या टिमलाही त्यांचे विशेष अप्रुप झाले.  

 

दहा दिवसांचा कालावधी या  बाबाला खूप मोठा झाला.दोन दिवसापूर्वीच त्यांचे ऑक्सीजन जेव्हा काढले  तेव्हा हे बाबा आता मला घरी जावू द्या म्हणून डॉक्टराच्या मागे लागले. डॉक्टरांनी त्यांना निरीक्षणाखाली ठेवून सर्व खातरजमा झाल्यानंतर आज ‍रुग्णालयातून सूट्टी देण्याचा निर्णय घेतला. 


संकटकाळात चांगल्या वैद्यकीय डाँक्टरांचा सल्ला मिळाला.यात वैद्यकीय अधिक्षक डॉ.उत्तम धुमाळे डॉ.बालाजी तेलंग HLL.महालॅब्स incharge- Lab.Technician बालाजी पाटील सिरसाट व्यंकटेश सोनटक्के साहेब यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शन मिळाले.त्याच बरोबर माझे मित्र सचिन पाटील कदम,सदानंद पांचाळ, निलेश कांबळे, शुभम पांचाळ यांचे ही मोलाची साथ मिळाली.


आजवरच्या कोविड उपचारात उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर सर्व नर्सेस,कोविड वार्डातील सर्व कर्मचारी त्यांचे रितेश मंत्री व त्यांच्या परिवाराने सर्वांचे आभार मानले आहेत.

No comments:

Post a Comment

Pages