बुध्दजयंती निमित्त बुध्दपहाट फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन ; प्रभोधुन फेम प्रसिद्ध गायिका स्नेहल प्रधान यांची हजेरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 14 May 2021

बुध्दजयंती निमित्त बुध्दपहाट फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन ; प्रभोधुन फेम प्रसिद्ध गायिका स्नेहल प्रधान यांची हजेरी

नांदेड -(प्रतिनिधी)

शांतीदूत विश्ववंदनिय महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या  जयंती  निमित्त संगीतमय आदरांजलीपर होणारा  बुध्दपहाट  कार्यक्रम यावर्षी दि.२६ मे रोजी बुधवारी पहाटे ५ वाजता आयोजित करण्यात आला असून हा कार्यक्रम (कोव्हिड १९ ) कोरोना माहामारीमुळे नमस्कार महाराष्ट्र फेसबुकवर लाईव्ह सादरीकरण केले जाणार आहे.


डाॅ.बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅण्ड कल्चरल मुहमेंटच्या वतीने  दरवर्षी बुध्दपोर्णीमा निमित्त प्रसिद्ध संगीतकार संयोजक प्रमोद गजभारे प्रस्तुत बुध्दपहाट या संगीतमय कार्यक्रमाचे हे सलग तेरावे वर्ष आहे. या कार्यक्रमात आतापर्यंत उतरा केळकर,अमृता पाटील,भाग्यश्री देशपांडे यासह नामवंत कलावंतांनी हजेरी लावली आहे.यावर्षी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण हे प्रबोधुन फेम प्रशिध्द गायीका स्नेहल प्रधान (औरंगाबाद)या असणार आहेत.यासोबतच प्रतिभा संपन्न गायिका पोर्णिमा कांबळे,अनुपमा पाटील, श्रीरंग चिंतेवार,नामदेव इंगळे,संजय भगत,देवदत्त साने,

संजय गोपाळे, शुध्दोधन कदम,महेंद्र कदम रतन चित्ते,प्रदीप डावरे आदी नामवंत गायक व वाद्यकलावंत साथसंगत करणार आहेत. कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली असून पूज्य भंदत विनय बोध्दीप्रिय थेरो,व फुले शाहू,आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत पोर्णिमा नगर येथील बुध्दविहार येथून सदारीकरण करून नमस्कार महाराष्ट्र फेसबुक लाईव्ह करण्यात येणार आहे.सर्वांनी आपल्या परीवारासह हा कार्यक्रम आपापल्या घरी बसून सकाळी सुरवातीपासून कार्यक्रम पहावा व सकाळी एकाचवेळी बुध्दांना वंदन करून भंते विनय बोध्दीप्रिय थेरो यांच्याकडून त्रिशरण पंचशील घ्यावे. हा कार्यक्रम यावर्षी देशविदेशातील बौध्दभिकू उपासक व उपासीका आपल्या फेसबुकवर, कनेक्ट होऊन कार्यक्रम जगभर सादर होणार आहे.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष रोहिदास कांबळे,संयोजक प्रमोद गजभारे,पत्रकार प्रकाश कांबळे,बुध्दपहाटचे प्रसिद्धप्रमुख पत्रकार सुभाष लोणे,पत्रकार दत्ताहारी धोत्रे,रवि गायकवाड, टी.पी.वाघमारे, सुरेश गजभारे,दिनेश सुर्यवंशी,संजय बुक्तरे,भगवान गायकवाड,राजकुमार स्वामी,अॅड.एम.जी.बादलगावकर,अविनाश गायकवाड,संघरत्न चिखलीकर,संजय रत्नपारखे,संघरत्न पवार,शिलरत्न चावरे,राजरत्न पवार,धर्मेंद्र कांबळे,पंडित आढाव,आदी परिश्रम घेत आहेत  धम्मप्रिय बांधवांनी नमस्कार महाराष्ट्र फेसबुकवर कनेक्ट होऊन लाईव्ह पहावा असे आवाहन रोहीदास कांबळे,प्रमोद गजभारे प्रसिद्धी प्रमुख सुभाष लोणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे  केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages