भुकेलेल्यासाठी अन्नाची "शिदोरी" ; टाळेबंदीत ठरत आहे " आधार' - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 24 May 2021

भुकेलेल्यासाठी अन्नाची "शिदोरी" ; टाळेबंदीत ठरत आहे " आधार'

नांदेड : कोरोना सारख्या महामारीच्या काळात..कोणतीही सोय नाही..ना कोणी मदतीला ..ना कोणी आस्थेवाईकपणे विचारपूस करणारे.. जगण्यावर संकट ओढवलेले असताना , भुकेने   व्याकुळ झालेल्या जीवाला .."शिदोरी " मिळाली ..सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारे...गरजवंतच्या मदतीला धावून जाणारे ..खासदार  हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांच्यामुळे  गेल्या पंधरा दिवसापासून  रुग्णालयात येणाऱ्या उपाशी  पोटाला पोटभरून " अन्न " मिळतंय..त्यामुळे पोटभरून तृप्त झालेले  हात अंतःकरणाने "दुवा " देत आहेत .

           तेरवी विधीवर होणारा अनाठाई खर्च टाळून त्याऐवजी  कोरोनाबाधित रुग्णांच्या गरजू नातेवाईकांसाठी अन्नदान करण्याच्या उद्देशाने खासदार हेमंत पाटील आणि गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी सुरु केलेल्या  "शिदोरी" या सामाजिक उपक्रमाला रुग्णालयातील रुग्ण आणि  नातेवाईकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे . आजवर ८ हजार च्यावर नागरिकांनी याचा लाभ घेतला असून यामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे . गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्री हेमंत पाटील यांच्या मातोश्री तथा खासदार हेमंत पाटील यांच्या सासू कै. पुष्पाताई महल्ले यांचे कोरोनाआजाराने निधन झाले  यामुळे  परिवारावरील मायेचे छत्र हरवले. कोरोनाने  कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला हिरावून घेतल्यामुळे सर्वाना खूप मोठा धक्का बसला परिवारातील व्यक्ती गमावल्यामुळे  कोरोनाचा कहर किती भयावह आहे याची जाणीव झाली.  मागील दोन महिन्यापासून कोरोनाचा कहर वाढल्यामुळे  नांदेड शहरात रुग्ण संख्या वाढत आहे  उपचारासाठी दाखल असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांच्या जेवणाची गैरसोय होत असल्याची बाब लक्षात आल्यानंतर रुग्ण नातेवाईकांना आपल्याकडून मायेची मदत व्हावी या उद्देशाने शिदोरी उपक्रमाला सुरवात झाली ५ मे रोजी या उप्रकमाला सुरवात झाल्यापासून आजवर ८ हजार च्या वर नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन खासदार हेमंत पाटील आणि राजश्री पाटील यांना अनेक आशीर्वाद दिले आहेत अनेकजण आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले कि, तुमच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला  असताना सुद्धा तुम्ही सर्व सामान्य जनतेसाठी अन्नदानाची व्यवस्था केली आहे यामुळे आपल्या मनात सर्व सामान्य जनतेसाठी असलेली तळमळ आणि आस्था दिसून येते . तुमच्यामुळे बाहरेगावावरून नांदेड मध्ये उपचार घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांना खूप मोठा आधार झाला आहे. येथील श्री.गुरुगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात सुरु असलेल्या या शिदोरीचा रोज ४५० ते ५०० जण लाभ घेत आहेत सोबतच रुग्णांना लागणारी आरोग्य सेवा सुद्धा आरोग्यदूताच्या मार्फत पुरविल्या जात आहेत .

No comments:

Post a Comment

Pages