नवी दिल्ली, 23
26 मे 2021 रोजी पूर्व किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असलेल्या यास चक्रीवादळामुळे होणारा परिणाम कमी करण्यासाठी सशस्त्र दलाने तयारी सुरु केली आहे. 23 मे पर्यंत भारतीय हवाई दलाने जामनगर, वाराणसी, पाटणा आणि अराकोन्नम इथून 15 विमानांद्वारे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) 950 कर्मचाऱ्यांना आणि 70 टन सामग्री कोलकाता, भुवनेश्वर आणि पोर्ट ब्लेअर येथे पोहोचविण्यात आली आहे.
त्वरित तैनात करण्यासाठी सोळा विमाने आणि 26 हेलिकॉप्टर्स सज्ज ठेवण्यात आली आहेत.
भारतीय नौदलाने, मानवी सहाय्य आणि आपत्ती निवारण ( एचएडीआर ) तसेच पश्चिम किनार्यावरील बचाव कार्यातून आलेले ताज्या दमाचे 100 एचएडीआर पॅलेट्स भुवनेश्वर आणि कोलकाता येथे हलवले आहेत, तर पोर्ट ब्लेअरवर पाच एचएडीआर पॅलेट्स सज्ज आहेत.
या चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन लोकांना मदत साहित्य पुरविण्यासाठी पूर्व नौदल कमांड आणि अंदमान निकोबार कमांडची आठ जहाजे मानवी सहाय्य आणि आपत्ती निवारण साहित्य घेऊन निघाली आहेत.
तातडीची सूचना मिळाल्यास नागरी प्रशासनाच्या मदतीसाठी कोलकाता, भुवनेश्वर आणि चिल्का येथे चार सागरी बचाव पथके आणि 10 पूर बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.
No comments:
Post a Comment