पत्रकाराचा असाही प्रामाणीकपणा खात्यावर चुकुन आलेली रक्कम केली परत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 12 May 2021

पत्रकाराचा असाही प्रामाणीकपणा खात्यावर चुकुन आलेली रक्कम केली परत

किनवट  : तालुक्यातील युवाकवी टाईम्स ऑफ किनवट पोर्टलचे सुशिक्षित पत्रकार राजेश पाटील यांच्या कॅनडा बँकेच्या खात्यावर पुणे येथील अभिजीत गणपती पवार यांच्या कॅनराच्या खात्यावरून भोजराज नगराळे अबांडीकर यांच्या ५०००रू.खात्यावर रक्कम पाठवायची होती ती शेवटच्या दोन अंकाने चुकुन किनवट येथील होतकरू युवक राजेश पाटील किनवट यांच्या खात्यावर जमा झाल्याने सदरील खातेधारकाने चुकुन तुमच्या खात्यावर माझे पाच हजार जमा झाले ते मला ते द्यावे अशी विनंती केली यावेळी राजेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता कॅनरा शाखेत जाऊन विचारपुस केली व पैसे उचलुन परत केले या वेळी भोजराज नगराळे यांनी आभार मानले या गोष्टीचे कोमल भवरे, गंगाधर कदम, शिलरत्न पाटील, सिद्धांत फूलझेले, संजय नरवाडे,लक्ष्मीकांता कापसे, गजु बावणे, शिवा सिडाम, राजु पांडे, प्रफुल आढागळे , सम्यक सरपे आदी मित्र मंडळीतुन कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment

Pages